Goa Congress: विद्यार्थ्यांना भेटण्यापासून राहुल गांधींना रोखले; प्रदेश युवक कॉंग्रेसकडून निषेध

Rahul Gandhi Bihar Police Incident: काँग्रेस कार्यालयाबाहेर आज सकारी प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने कार्यकारी अध्यक्ष महेश नदार यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केले.
Rahul Gandhi Bihar Police Incident, Goa Protest
Goa Congress ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बिहार पोलिसांनी राहुल गांधी यांना ज्या प्रकारे मारहाण करून त्यांना आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भेटण्यास अटकाव केल्याप्रकरणाचा प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने निषेध केला.

काँग्रेस कार्यालयाबाहेर सकाळी प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने कार्यकारी अध्यक्ष महेश नदार यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केले. बिहार सरकारविरोधात घोषणाबाजी करीत युवकांनी निषेध नोंदविला.

Rahul Gandhi Bihar Police Incident, Goa Protest
Rahul Gandhi: 'आपण भाजप, RSS आणि भारतीय राज्याशी लढतोय'; राहुल गांधींच्या वक्तव्याने नवा वाद होणार?

नदार म्हणाले की, राहुल गांधी हे बिहारमधील आंबेडकर वसतिगृहात मागास विद्यार्थ्यांना भेटण्यास चालले होते, तेथे बिहार पोलिसांनी त्यांना अटकाव केला, हे घृणास्पद आहे.

Rahul Gandhi Bihar Police Incident, Goa Protest
Goa Congress: मटकाविरोधी कारवाईची सरकारला आताच का जाग? काँग्रेस सरचिटणीसांचा सरकारवर हल्लाबोल

राहूल गांधी हे अशाप्रकारच्या अटकावाला भीत नाहीत, ते आपली भूमिका सडेतोडपणे मांडतील. विद्यार्थ्यांचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेण्यासाठी राहुल गांधी चालले असताना त्यांना अटकाव करणे कितपत योग्य आहे, असा सवाल महेश नदार यांनी केला. बिहारमध्ये झालेल्या प्रकाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल होईल, असेही नदार यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com