
पणजी: काजू उत्पादनात गोवा हे एकमेव राज्य आहे, जे आधारभूत किंमत उत्पादकांना देते आणि आता ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध करणार आहोत. गोवा वन विकास महामंडळाने स्वतःच्या जमिनीवर काजूचे उत्पादन सुरू केले असून, त्यांनी तयार केलेला ‘सिल्वेन कॅश्यू’ ब्रॅण्ड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचणार आहे. या काजूला क्यूआर कोड देण्यात आला आहे, ज्याद्वारे ग्राहक उत्पादनाची माहिती मिळवू शकतात, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
काजू महोत्सवास वनमंत्री विश्वजीत राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, गोवा वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. दिव्या राणे, आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार उल्हास तुयेकर, गोवा पर्यटन विकास महामंडळ अध्यक्ष गणेश गावकर, आमदार चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, वन खात्याचे पीसीसीएफ कमल दत्त, महाव्यवस्थापक अमर हेबळेकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. उदघाटनप्रसंगी गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध नृत्यप्रकार सादर करण्यात आले.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील छोट्या आणि नवोदित काजू उत्पादकांना मोठा आधार मिळणार आहे. कृषी कार्ड नसल्याने अनेकांना आजवर लाभ मिळत नव्हता. ही अडचण दूर झाल्यास गोव्यातील काजू क्षेत्र अधिक व्यापक आणि सक्षम होईल. स्वयंपूर्ण गोवा ही केवळ घोषणा न राहता ती कृतीत उतरवण्याचा हा सकारात्मक टप्पा आहे.
या महोत्सवात अनेक उत्पादक आणि स्थानिक पंचायतींचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या योगदानाची दखल घेत सरकारने भविष्यातील योजनांमध्ये त्यांचा समावेश करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.