Margaret Alva Ex-Goa Governor File Photo
देश

Margaret Alva: गोव्यासाठी अभिमानाचा क्षण; माजी राज्यपाल उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या मार्गारेट अल्वांच्या सासूबाई म्हणजेच वायलेट अल्वा 1960 च्या दशकात राज्यसभेच्या सभापती होत्या.

दैनिक गोमन्तक

Vice President Candidate Margaret Alva: विरोधी आघाडीकडून माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज त्यांच्या नावाची घोषणा केली. काल भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वाच्या कार्यालयासाठी उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर आज अल्वा यांच्या घोषणा झाली. अल्वा यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोव्यात देखील या नावाची चर्चा होवू लागली आहे. कारण अल्वा आणि गोवा यांचे एक खास नाते राहिले आहे.

कोण आहेत मार्गारेट अल्वा?

मार्गारेट अल्वा माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्या आहेत. अल्वा यांनी यापूर्वी राजस्थान, गोवा, गुजरात आणि उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून काम केले आहे. 70 च्या दशकात कर्नाटकातील पहिल्या महिला ब्लॉक अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 1972 मध्ये त्या कर्नाटकातील काँग्रेसच्या महिला शाखेच्या प्रमुख बनल्या. त्यानंतर अगदी थोड्याच दिवसात त्या कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस झाल्या.

मंत्रालयांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री (MoS) म्हणून काम

1974 ते 1998 या काळात अल्वा कर्नाटकमधून राज्यसभेच्या सदस्य होत्या. तर 1999 ते 2004 पर्यंत लोकसभेच्याही सदस्य होत्या. 1999 मध्ये त्या उत्तर कन्नड मतदारसंघातून 13व्या लोकसभेवर निवडून आल्या. या संपूर्ण काळात अल्वा यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात संसदीय कार्य, युवा आणि क्रीडा, महिला आणि बाल विकास या मंत्रालयांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री (MoS) म्हणून काम केले आहे.

गोवा या राज्यांचीही काही दिवसांसाठी अतिरिक्त जबाबदारी

पुढे 2009 मध्ये अल्वा यांची उत्तराखंडच्या राज्यपालपदी वर्णी लागली. तर 2012 मध्ये त्यांना राजस्थानच्या राज्यपालपदी पाठविण्यात आले. राजस्थानचे राज्यपाल म्हणून काम करत असताना अल्वा यांच्याकडे गुजरात आणि गोवा या राज्यांचीही काही दिवसांसाठी अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. जुलै 2014 मध्ये गोव्याचे तत्कालीन राज्यपाल बीव्ही वांचू यांना हेलिकॉप्टर सौद्यात राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

काँग्रेसच्या 'गोवा प्रदेश प्रभारी'

त्यानंतर पुढील महिन्याभरासाठी अल्वा यांच्याकडे गोव्याचे अतिरिक्त राज्यपालपद सोपविण्यात आले होते. पणजी येथील राजभवनात एका समारंभात गोव्याच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालिन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, आणि इतर आमदारांच्या उपस्थितीत मार्गारेट अल्वा यांना पदाची शपथ दिली होती. अल्वा यापूर्वी काँग्रेसच्या 'गोवा प्रदेश प्रभारी' होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT