विरोधी आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदासाठी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी

विरोधी आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदासाठी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी; शरद पवारांनी केली घोषणा
Margaret Alva
Margaret AlvaDainik gomantak
Published on
Updated on

Vice President Candidate: राष्ट्रपतीपद भारतातील सर्वोच्च घटनात्मक पद आहे आणि उपराष्ट्रपतीचे दुसरे सर्वोच्च पद आहे. काल पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर हे भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी NDA चे उमेदवार जाहिर केल्यानंतर आज विरोधी आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदासाठी मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांना उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा शरद पवारांनी (Sharad Pawar) केली आहे. शरद पवारांच्या घरी मागच्या एका तासापासून बैठक सुरु होती. या बैठकीला 17 पक्षांचे नेते उपस्थित होते.

ऑगस्टमध्ये होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अल्वा यांनी राजस्थान, गोवा आणि उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून अनेक वेळा काम केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी रविवारी उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक झाली. मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेनेचे संजय राऊत आणि टीआरएसचे केशव राव यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

Margaret Alva
कधी गोड तर कधी आंबट; जगदीप धनखड-ममता बॅनर्जींचे राजकीय संबंध ठरले होते देशात चर्चेचा विषय

खासदारांनी त्यांच्या पक्षाशी संलग्नतेनुसार मतदान केल्यास उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी होणे स्पष्ट आहे. शनिवारी, भाजपने बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना एनडीए कडून उमेदवारी घोषित केली आहे. भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांनी त्यांच्या निवडीवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक झाल्यानंतर ही घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com