प्रकाश जावडेकर dainik gomantak
देश

केंद्र सरकारचे पाच माजी मंत्री बदलणार पत्ता, सरकारी बंगला सोडणार

प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, माजी शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी सोडले सरकारी बंगले

दैनिक गोमन्तक

नवी दिेल्ली : केंद्र सरकारच्या काही माजी केंद्रीय मंत्र्यांनी सरकारी बंगला रिकामा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या मंत्र्यांऐवजी सध्याच्या मंत्र्यांना हे बंगले देण्यात येणार आहेत. लवकरच हे माजी मंत्री त्यांच्या पात्रतेच्या श्रेणीनुसार वाटप करण्यात आलेल्या बंगल्यांमध्ये जातील. शुक्रवारी माहिती देताना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्र सरकारचे पाच माजी केंद्रीय मंत्री असून ज्यांनी सरकारी बंगले रिकामे करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, माजी शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचा समावेश आहे. निशंक यांचा 27, सफदरजंग रोड हा बंगला नुकताच नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना देण्यात आला आहे. तर इतर मंत्री लवकरच त्यांच्या पात्रता श्रेणी (टाइप-7 बांग्ला) मध्ये जातील. सध्या हे सर्वजण टाइप-8 बंगल्यात राहतात. (Five former central ministers will change their address)

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी चिराग पासवान यांना त्यांच्या 12 जनपथ बंगला खाली करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. हा बंगला त्यांचे दिवंगत वडील रामविलास पासवान यांना 1990 मध्ये देण्यात आला होता. मंत्री आणि खासदारांसाठी (MP) गृहनिर्माण नियमांबद्दल माहिती देताना मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, टाईप-8 बंगले केंद्रीय मंत्री आणि न्यायव्यवस्थेतील वरिष्ठ सदस्यांना दिले जातात. माजी मंत्र्यांना साधारणपणे टाईप-7 निवासाचा हक्क आहे.

1लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभेच्या (Rajya Sabha) स्वतःच्या गृहनिर्माण समित्या आहेत ज्या त्यांच्या सदस्यांना त्यांच्या कोट्यातून सरकारी निवासस्थान (Government Residence) देतात. त्यांच्याकडे काही टाइप-8 बंगले देखील आहेत, परंतु खासदारांना सहसा टाइप-7 श्रेणीपेक्षा कमी बंगले दिले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

VIDEO: "...अन् डोळ्यासमोर अंधारीच आली!" मेलबर्नमध्ये मोहम्मद रिझवानची फजिती; नाजूक जागी चेंडू लागताच मैदानात उडाली खळबळ

Mangal Gochar 2026: नशिबाची साथ अन् पैशांची बरसात! मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; गुंतवणूकीतून मिळणार मोठा परतावा

SCROLL FOR NEXT