PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

PM Narendra Modi: पहिली वॉटर मेट्रो, पहिली वंदे भारत ट्रेन, पहिले डिजिटल सायन्स पार्क; पंतप्रधान मोदींचे केरळला गिफ्ट

गोमंतक ऑनलाईन टीम

PM Narendra Modi Kerala Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 25 एप्रिल रोजी केरळमध्ये देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. वॉटर मेट्रो इलेक्ट्रिक हायब्रीड बोटीद्वारे 10 बेटांना कोचीशी जोडेल. याशिवाय केरळच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनलाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. तसेच डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणीही ते करणार आहेत.

वॉटर मेट्रो बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक हायब्रीड बोटीद्वारे कोचीच्या आसपासच्या 10 बेटांना शहरांशी जोडली जाणार आहे. कोचीसारख्या शहरात ही वॉटर मेट्रो खूप महत्वाची ठरणार आहे.

तिरुअनंतपुरम आणि कासारगोड दरम्यान केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. वंदे भारत एक्सप्रेस ही स्वदेशी बनावटीची, अर्ध-हाय स्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहे.

पीएम मोदी 3200 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. तिरुवनंतपुरम, कोझिकोड, वर्कला शिवगिरी रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासह विविध रेल्वे प्रकल्पांची ते पायाभरणी करणार आहेत.

या दौऱ्यात पंतप्रधान तिरुअनंतपुरममध्ये देशातील पहिल्या डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणीही करतील. हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करायचा आहे. या उद्यानात सुरुवातीला दोन लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या दोन इमारती असतील.

एका इमारतीत पाच मजले असतील, ज्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स, संशोधन प्रयोगशाळा आणि डिजिटल इनक्यूबेटर असेल. दुसऱ्या इमारतीत प्रशासकीय केंद्र असेल.

कबानी, टेक्नोपार्क फेज IV येथे 10,000 चौरस फूट जागेत डिजिटल सायन्स पार्क येत्या काही महिन्यांत कार्यान्वित होईल. डिजिटल सायन्स पार्कमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), डेटा अॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा आदी क्षेत्रात संशोधन करता येते.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रारंभिक गुंतवणूक सुमारे 200 कोटी रुपये आहे, तर प्रकल्पावरील एकूण खर्च अंदाजे 1,515 कोटी रुपये आहे.

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी ट्विट केले होते की, “मी तिरुअनंतपुरमच्या लोकांना भेटण्यासासाठी उत्सुक आहे. वंदे भारत एक्सप्रेसचा पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. तिरुवनंतपुरम, कोझिकोड आणि वर्कला शिवगिरी रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही केली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Goa: म्हापशात 510 किलो पनीरसह कांदा जप्त; एफडीएकडून दुसऱ्यांदा कारवाई

Goa Crime: कौटुंबिक वादातून महिलेने उचललं मोठ पाऊल; पोटच्या मुलांना फिनाईल पाजत केला आत्महत्येचा प्रयत्न

Mormugao Sada: सडा परिसरात लवकरच उभे राहणार प्राथमिक आरोग्य केंद्र; मुख्यमंत्री सावंत

FC Goa: नुवेच्या रॉलिन बोर्जिस याच्याशी एफसी गोवाचा कायमस्वरुपी करार, अनुभवाचा होणार फायदा

Goa Today's Live News: आठव्या अधिवेशनासाठी विरोधकांची रणनीतीवर चर्चा

SCROLL FOR NEXT