Cheetah Death: दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या उदय चित्त्याचा कुनो नॅशनल पार्कमध्ये मृत्यू

कुनो नॅशनल कार्कमधील उदय चित्त्याचा उपचारादरम्यान मृत्यृ झाला आहे.
Cheetahs
CheetahsDainik Gomantak
Published on
Updated on

Cheetah Death: मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या उदय चित्त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू  झाला आहे. रविवारी चार वाजण्याच्या सुमारास चित्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मागील दोन महिन्यात कुनो नॅशनल पार्कमध्ये दुसऱ्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी कुनो पार्कमध्ये मादी चित्ता साशा हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता उदय या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (23 एप्रिल) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चित्ता उदय मान खाली घालून जमिनीवर पडलेला दिसून आला.

त्याच्याजवळ गेल्यानंतर तो लंगडत चालताना दिसला. त्यानंतर याची सूचना वन्यप्राणी चिकित्सकांना देण्यात आली. त्यानंतर उदयची तपासणी केल्यानंतर तो आजारी असल्याचे दिसून आले. उदयला उपचारासाठी ट्रॅकुलाइज केलं.

त्यानंतर बेशुद्ध करुन त्याच्यावर उपचार सुरु केले होते. पण उदयची प्रकृती पाहून त्याला पुढील उपाचर आणि निरीक्षणासाठी आयसोलेशन वार्डात ठेवलं होतं. पण रविवारी चार वाजण्याच्या सुमारास उदयचा मृत्यू झाला.

दरम्यान, उदय या चित्त्याचा मृत्यू  नेमका कशामुळं झाला याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याबाबतची माहिती मिळू शकेल असे प्रधान मुख्य वनसंरक्षक जे. एस. चौहान यांनी सांगितलं. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या 20 चित्त्यांपैकी आता 18 चित्ते उरले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आठ चित्त्यांना गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होतं. यातील दोन चित्त्यांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com