Goa will Attracts European Tourist : गोव्यात पुर्वी दाबोळीचे एकच विमानतळ होते. गेल्या वर्षी मोपा येथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले. त्यासोबत आता गोव्यातील पर्यटनासाठी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न राज्य पातळीवरून पर्यटन विभागाकडून सुरू झाले आहेत.
त्यामध्ये विशेषतः युरोपवर लक्ष केंद्रित केले जात असून युरोपमधील चार देशांकडे नवीन संधी म्हणून पाहिले जात आहे. या फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड या देशांचा समावेश आहे. गोवा चेम्बर्स ऑफ कॉमर्सच्या हवाल्याने इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
गोव्यातील नवीन विमानतळामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये गोवा पुन्हा पर्यटनाच्या यादीत वर आला आहे. युरोपीय देशांमध्ये गोव्याला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून पुन्हा पुनरूज्जीवीत करण्याचा प्रयत्न पर्यटन विभाग करत आहे.
गेल्या दशकभरात युरोपियन लोकांचा गोव्याकडील ओढा कमी झाल्याचे सांगितले जात असले तरी या पारंपरिक मार्केटवर पुन्हा कब्जा करण्यासाठी पर्यटन विभाग नव्याने प्रयत्न चालवले आहेत.
20 ट्रॅव्हल कंपन्यांचे प्रतिनिधी गोव्याच्या मार्केटिंगसाठी उत्सुक आहेत. ते युरोपमध्ये सुरू असलेल्या प्रमोशनचाही भाग आहेत. टुरिझम प्रमोशन बोर्डने गोव्याच्या प्रमोशनसाठी या चार देशांत जायचा निर्णय घेतला आहे.
राज्यात आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने आता विमानतळावर लँडिंग स्लॉटसाठी पुर्वीप्रमाणे अडचणी जाणवणार नाहीत, हे तिथे पटवून दिले जाणार आहे, असे कळते. युरोपमधील प्रोमो इव्हेंटसाठी GMR च वरिष्ठ अधिकारीही उपस्थित असतील. ते टूर ऑपरेटर्सची लँडिंग स्लॉटबाबतची संदिग्धता दूर करतील.
1980 च्या दशकात गोव्यात चार्टर ऑपरेशन्स सुरू करणार्या पहिल्या एअरलाइन्सपैकी एक असलेल्या जर्मनीच्या कॉन्डोरने सप्टेंबर 2014 मध्ये त्यांची सेवा बंद केली. 2013-2014 हंगामात, गोव्याला 55,932 जर्मन पर्यटक आले. ती आत्तापर्यंतची सर्वोच्च संख्या होती. परंतु त्यानंतर चार्टर ऑपरेशन्स बंद झाल्याने जर्मन्सच्या आगमनात मोठी घट झाली.
2020 मध्ये, जर्मनीतील 5,000 पेक्षा कमी प्रवासी गोव्याला आले. फिनलंड, फ्रान्स आणि स्वित्झर्लंड येथूनही गोव्यात येणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. इतर युरोपीय राष्ट्रांमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी नाही. दरम्यान, चार्टर विभागावरही लक्ष दिले जाणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.