3D-Printed Public Building In India:  Dainik Gomantak
देश

3D-Printed Public Building In India: देशात पहिल्यांदाच इमारतीचे थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाने बांधकाम, 8 महिन्यांचे काम अवघ्या ...

या इमारतीच्या बाधंकामाचा व्हिडिओ रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला आहे.

Puja Bonkile

3D-Printed Public Building In India: देशात पहिल्यांदाच इमारतीचे थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाने बांधकाम होत आहे. उलसूर बाजार पोस्ट ऑफिस केंब्रिज लेआउट ही भारतातील पहिली 3D प्रिंटेड इमारत म्हणुन ओळखली जाणार आहे. 

येथील काम 22 मार्च रोजी सुरू झाले असून ते 45 दिवसांच्या मुदतीत पूर्ण होणार आहे. 23 लाख रुपयांच्या बजेटमध्ये इमारत बांधणाऱ्या L&T कन्स्ट्रक्शनने या प्रकल्पादरम्यान मीडिया संवादाचे आयोजन केले होते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही याबाबत ट्विट करत व्हिडिओ शेअर केला आहे.

या शुक्रवारपर्यंत (14 एप्रिल) छपाईची प्रक्रिया पूर्ण होईल, असे लार्सन अँड टुब्रो कन्स्ट्रक्शनचे संचालक आणि वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष एमव्ही सतीश यांनी सांगितले आहे. पारंपारिकरित्या बांधलेल्या इमारतींच्या तुलनेत 3D तंत्रामुळे वेळेची मोठी बचत होते.

1100 चौरस फूट जागेत बांधलेले हे पोस्ट ऑफिस तयार करण्यासाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागणार होता. पण या 3D तंत्र फक्त 45 दिवसात पूर्ण होणार आहे. हे काम फक्त पाच लोक पुर्ण करु शकतात.

खर्चाबाबत विचारले असता ते म्हणाले की, खर्च आता सारखाच आहे. भविष्यात आपण हे मोठ्या प्रमाणावर केले तर ते आणखी कमी होऊ शकते. ते म्हणाले की 3 D काँक्रीटची रचना अतिशय मजबूत आहे. 

सतीश म्हणाले की, या तंत्रज्ञानाला बिल्डिंग मटेरियल्स अँड टेक्नॉलॉजी प्रमोशन कौन्सिलने (BMTPC) मान्यता दिली आहे. पोस्ट ऑफिसच्या स्ट्रक्चरल डिझाईनला IIT मद्रासने प्रमाणित केले आहे.

पोस्ट ऑफिसच्या इमारतीची 3D प्रिंटिंग पूर्णपणे स्वयंचलित 3D प्रिंटरचा वापर करून 'ओपन टू स्काय' वातावरणात 'सिटू' करण्यात आली आहे, असे अधिकृत प्रकाशनात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT