Kolkata Twitter / ANI
देश

कोलकात्यात गोळीबार, महिलेची हत्या करुन पोलिस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

कोलकातामध्ये बांगलादेशच्या डेप्यूटी हाय कमीशनसमोर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

दैनिक गोमन्तक

कोलकातामध्ये बांगलादेशच्या डेप्यूटी हाय कमीशनसमोर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. हा गोळीबार एका पोलिस कर्मचाऱ्याने केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारानंतर एकच गोंधळ उडाला. गोळीबारादरम्यान शेजारील लोक सैरावैरा धावू लागले. त्याचवेळी रस्त्याने येणाऱ्या एका महिलेवरही पोलिसाने गोळी झाडली. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. (firing by policeman bangladesh deputy high commission in kolkata)

पोलिस कर्मचारी अचानक बाहेर आला

पोलिस (Police) कर्मचारी अचानक बाहेर आला आणि त्याने गोळीबार सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबारात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. त्याचवेळी गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वरही गोळी झाडली. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हा पोलीस कर्मचारी कोण होता आणि त्याने एवढी मोठी घटना का घडवली हे अद्याप तरी कळू शकलेले नाही. याशिवाय पोलिसाच्या गोळीबारात ठार झालेल्या महिलेचीही ओळख पटलेली नाही.

पाच मिनिटे गोळीबार

त्याचवेळी या घटनेबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या रायफलमधून गोळीबार केला. त्यामुळे दुचाकीच्या मागे बसलेल्या महिलेला (Women) गोळी लागली आणि ती दुचाकीवरुन पडली. गोळीबारामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही वेळ गोळीबार केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडली. तर दुसरीकडे, महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचा दावा करणाऱ्या बबलू शेखने सांगितले की, संपूर्ण घटना सुमारे पाच मिनिटे चालली. या घटनेनंतर काही मिनिटांतच मोठ्या संख्येने पोलिस तिथे पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT