Exactly 22 years ago today on 13 December 2001, terrorist attacked on the Indian Parliament House:
आजपासून बरोबर 22 वर्षांपूर्वी...तारीख 13 डिसेंबर 2001, सकाळपर्यंत सर्व काही सुरळीत होते. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले होते.
'कफन चोर, सिंहासन छोड... सेना खून बहाती है, सरकार दलाली खाती है' अशा घोषणा देत शवपेटी घोटाळ्यावरून विरोधी पक्षाचे खासदार राज्यसभेत आणि लोकसभेत गोंधळ घालत होते. यानंतर सभागृहाचे कामकाज ४५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी संसदेतून घराकडे निघाले होते. मात्र, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि इतर खासदार संसदेत उपस्थित होते.
तेवढ्यात जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाचे पाच दहशतवादी एका पांढऱ्या अॅम्बेसेडर कारमधून संसद भवन परिसरात घुसले. एका दहशतवाद्याने संसद भवनाच्या गेटवर बॉम्बने स्वतःला उडवले.
उपराष्ट्रपतींचा चालक शेखर संसदेतील राज्यसभेच्या गेट क्रमांक ११ बाहेर त्यांची वाट पाहत होता. त्यानंतर आलेल्या स्फोटाचा आवाजाने शेखरची नजर दुसरीकडे वळली. त्याला काही समजण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी त्याच्या गाडीला धडक दिली आणि तो खाली उतरताच त्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली.
शेखर आपला जीव वाचवण्यासाठी गाडीच्या मागे लपला. यानंतर लगेचच उपराष्ट्रपतींच्या सुरक्षा रक्षकांनीही जबाबदारी स्वीकारली आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला.
उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना गोळ्यांचा आवाज येताच ते संसद भवनातील आपल्या कार्यालयातून बाहेर पडतात, मात्र सुरक्षा कर्मचारी त्यांना अडवले. त्यामुळे अडवाणी आपल्या कार्यालयात परतले आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना फोन केला. काही वेळातच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संसद भवनाचे दरवाजे बंद केले, त्यामुळे मोठा हल्ला टळला.
जसवंत सिंग यांच्या 'इंडिया अॅट रिस्क' या डायरीमध्ये ते लिहितात की, मी संसदेच्या गेट क्रमांक 27 पासून 20 फूट अंतरावर असलेल्या माझ्या ऑफिसमध्ये बसून फाइल्स पाहत होतो.
गोळ्यांचा आवाज ऐकून मला वाटले की, काही सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून चूकन ट्रिगर दाबला गेला असावा. त्यानंतर स्फोटाचा आवाजही ऐकू आला.
त्यानंर राघवन धावत आला आणि म्हणाला, सर, हे काय आहे? मी म्हणालो , मला इतके दिवस ज्याची भीती वाटत होती ती कदाचित घडली असेल. गोंधळ माजला होता, दरवाजे बंद होते आणि लोक इकडे तिकडे धावत होते. गोळीबाराचा आवाज आतून स्पष्ट ऐकू येत होता.
संसद भवनावर झालेल्या या हल्ल्यात सर्व दहशतवादी सुरक्षा दलांनी मारले. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये हैदर उर्फ तुफैल, मोहम्मर राणा, रणविजय, हमला यांचा समावेश आहे.
याशिवाय कॉन्स्टेबल कमलेश कुमारी यादव या पहिल्या शहीद झाल्या. यानंतर संसदेचा एक माळी, दोन सुरक्षा कर्मचारी आणि दिल्ली पोलिसांचे सहा कर्मचारीही शहीद झाले.
या दहशतवादी हल्ल्यामागे मोहम्मद अफजल गुरू, एसएआर गिलानी आणि शौकत हुसैन यांच्यासह पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात होता. या प्रकरणात 9 फेब्रुवारी 2013 रोजी अफझल गुरूला 12 वर्षांनी फाशी देण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.