Ram Mandir Ayodhya च्या मुख्य पुजाऱ्यांचे फेक फोटो ट्विट करणे भोवले, काँग्रेस नेत्याला अटक

गुजरातमध्ये गुन्हा दाखल
Hitendra Pithadiya
Hitendra Pithadiya Dainik Gomantak
Published on
Updated on

Ram Mandir Ayodhya Chief Priest Mohit Pandey : अयोध्येतील श्री राम मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून नुकतेच नियुक्त झालेले मोहित पांडे यांची सोशल मीडियावर बदनामी करण्याच्या प्रयत्नात गुजरात पोलिसांनी काँग्रेस नेते हितेंद्र पिठाडिया यांना अटक केली आहे.

पांडे यांचे काही आक्षेपार्ह फेक फोटोज प्रसारित केल्याचा आरोप पिठाडिया यांच्यावर आहे.

हितेंद्र पिठाडिया यांनी सोशल मीडिया साईट असलेल्या एक्सवरून हे अश्लील आणि बनावट फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये, "अयोध्या राम मंदिराचा पुजारी बनण्यासाठी या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे?" असा सवालही त्यांनी केला आहे.

या फोटोजमध्ये पांडे हे कपाळावर टिळक आणि चंदन लावलेले दिसतात. तसेच ते एका महिलेसोबत दिसून येतात. दुसऱ्या फोटोमध्येही पांडे आणि संबंधित महिला असून हा फोटोही अश्लील आहे.

Hitendra Pithadiya
Goa Tourism: गूगलवर 2023 मध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या टॉप 10 पर्यटन स्थळांमध्ये गोवा 'या' नंबरवर
fake viral photos of mohit pandey
fake viral photos of mohit pandey Dainik Gomantak

दरम्यान, गुजरातच्या सायबर क्राईम शाखेने काँग्रेसमधील एससी विभागाचे अध्यक्ष हितेंद्र पिठाडिया यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत धार्मिक भावना दुखावल्याचे आणि संबंधित व्यक्तींची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

तक्रारीनंतर सायबर क्राईम युनिटने तत्काळ कारवाई करत आरोपी नेत्याला अटक केली. खोट्या पोस्ट तयार करून त्या सोशल मीडियात प्रसारित केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिठाडिया यांच्यावर IPC 469, 509, IPC 295A आणि IT कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याच जोडप्याचे अनेक व्हिडिओ एका अश्लील (पॉर्न) वेबसाइटवर आढळून आले आहेत. संबंधित व्हिडिओमध्ये एक तेलुगू धर्मगुरू दिसून येत असून हे व्हिडिओ मोहित पांडे यांच्याशी संबंधित नाहीत. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मोहित पांडे नसल्याचे तपासात समोर आले आहे.

कोण आहे मोहित पांडे?

दूधेश्वर नाथ वेद विद्या पीठाचे विद्यार्थी असलेले मोहित पांडे यांची अयोध्येतील श्री राम मंदिरात मुख्य पुजारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पुजारी पदांसाठी घेतलेल्या सुमारे 3000 मुलाखतींमधून मोहित यांच्यासह 20 व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या सर्व पुरोहितांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

दरम्यान, सोशल मीडियात व्हायरल झालेले फोटोज, व्हिडिओजमधील व्यक्ती मोहित पांडे नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com