Video: बापाच्या शोधात लेक व्याकूळ! रडणाऱ्या मुलाचा व्हिडिओ पाहून तुम्हीही रोखू शकणार नाही अश्रू

गेल्या पाच दिवसांपासून सबरीमाला येथे भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत असून त्यात रस्ता चुकलेल्या एका रडणाऱ्या मुलाचा व्हिडिओ समोर आला आहे.
Sabarimala  Rush Video
Sabarimala Rush VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Sabarimala Rush Video: सबरीमाला येथे गेल्या पाच दिवसांपासून भाविकांची अलोट गर्दी दिसत आहे. पण गर्दीच्या गैरव्यवस्थापनावरून विरोधक सातत्याने केरळ सरकारवर टीका करत आहेत.

अलोट गर्दीमुळे अनेक यात्रेकरू शबरीमाला मंदिर आणि भगवान अय्यप्पाचे दर्शन न घेताच पंडालमधून परतत आहेत.

दरम्यान, सबरीमालामध्ये रस्ता चुकलेल्या एका रडणाऱ्या मुलाचा व्हिडिओ समोर आला आहे. निलक्कलमधील गर्दीत हरवलेल्या आपल्या वडिलांचा शोध घेत असलेले लहान मूल या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिसांसमोर हात जोडून मदत मागत आहे.

तासंतास वाट पाहूनही डोंगर चढता न आल्याने भाविक माघारी फिरतात. अजूनही भाविकांची अलोट गर्दी असूनही दिलासा मिळत नाही.

केएसआरटीसीच्या अनेक बस तासंतास थांबवण्यात आल्याने अनेकांना दहा तास ताटकळत उभे राहावे लागले. पंपा येथून केएसआरटीसीच्या बस दर दहा मिनिटांनी धावतात. अनेक वाहने जंगलाच्या रस्त्यावर तासंतास अडकून असतात. प्लापल्ली इलावुंकल मार्गासह जंगल परिसरात अडकलेल्या यात्रेकरूंना पाणी किंवा अन्न मिळत नाही. आज 89,981 लोकांनी दर्शनासाठी बुकिंग केले आहे, तर गर्दी आणि निर्बंध सुरूच आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सबरीमाला येथे यात्रेकरूंची संख्या वाढल्याने अधिक समन्वित व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. यात्रेकरूंचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात यावी.

आढावा बैठकीला देवस्वोम मंत्री के राधाकृष्णन, वनमंत्री ए के ससेंद्रन, मुख्य सचिव डॉ व्ही वेणू, देवस्वोम बोर्डाचे अध्यक्ष पी एस प्रशांत, राज्याचे पोलीस प्रमुख शेख दरवेश साहिब, जिल्हाधिकारी आणि इतर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com