Viral Video: "ऑफिसचं टार्गेट की मृत्यूला आमंत्रण?", चालत्या गाडीवर पठ्ठ्याचा भयंकर स्टंट; वाहतुकीच्या नियमांचे धिंडवडे काढणारा व्हिडिओ व्हायरल

Man Using Laptop While Riding Bike Viral Video: सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे जिथे रोज नवनवीन आणि थक्क करणारे व्हिडिओ पाहायला मिळतात.
Man Using Laptop While Riding Bike Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Man Using Laptop While Riding Bike Viral Video: सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे जिथे रोज नवनवीन आणि थक्क करणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी असतात, तर काही युझर्संना विचार करायला भाग पाडतात. सध्या इंटरनेटवर असाच एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणाने रस्त्यावरुन बाईक चालवताना केलेला पराक्रम पाहून कोणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

सामान्यतः रस्त्यावरुन दुचाकी चालवताना चालक आपले पूर्ण लक्ष ट्रॅफिक आणि रस्त्याकडे ठेवतात, जेणेकरुन अपघात होणार नाही. मात्र, या व्हिडिओमधील व्यक्तीने वाहतुकीच्या सर्व नियमांना केराची टोपली दाखवत चक्क चालत्या गाडीवर ऑफिसचे काम किंवा डिजिटल काम करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

Man Using Laptop While Riding Bike Viral Video
Viral Video: चालत्या ट्रेनमध्ये चढताना तरुणाचा तोल गेला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी काढले वाभाडे

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक व्यक्ती नेहमीप्रमाणे रस्त्यावरुन आपली मोटरसायकल चालवताना दिसते. पहिल्या नजरेत सर्व काही सामान्य वाटत असले, तरी काही सेकंदांनंतर या व्हिडिओमधील धक्कादायक वास्तव समोर येते. हा तरुण बाईक चालवण्यासोबतच आपल्या समोर उघडलेल्या लॅपटॉपवरही काम करत असल्याचे स्पष्ट होते. त्याने आपला चालू लॅपटॉप बाईकच्या टाकीवर ठेवला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो एका हाताने बाईकचे हँडल सांभाळत कधी रस्त्याकडे पाहतो, तर कधी लॅपटॉपच्या स्क्रीनवर नजर टाकतो. त्याचे दोन्ही डोळे आणि लक्ष पूर्णपणे लॅपटॉपच्या स्क्रीनवर खिळलेले असून तो काहीतरी टाईप किंवा डेटा चेक करत असल्याचे व्हिडिओमध्ये जाणवते.

Man Using Laptop While Riding Bike Viral Video
Viral Video: चोरी केली, पण नशिबानं खेळ केला! कारचालकानं भररस्त्यात चोराला ठेचलं; नेटकरी म्हणाले,"कर्माचा स्पीड पाहून 5जी इंटरनेटही लाजेल!"

हा तरुण नक्की कोणत्या प्रकारच्या कामात व्यस्त आहे, हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे समजू शकलेले नाही. मात्र, तो एखाद्या मोठ्या डेटा प्रोसेसिंग, सिस्टीम किंवा ऑनलाइन प्रोजेक्टवर काम करत असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. कामाचे कितीही दडपण किंवा घाई असली, तरी अशा प्रकारे चालत्या वाहनावर लॅपटॉप वापरणे हे स्वतःच्या आणि रस्त्यावरील इतर प्रवाशांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे. हा संपूर्ण प्रकार मागून येणाऱ्या एका वाहनचालकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून, हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा मुख्य विषय बनला.

Man Using Laptop While Riding Bike Viral Video
Viral Video: रिलचा नाद केला अन् घात झाला! 'त्या' अचानक धडकेनं पोरगी तोंडावर आपटली; व्हिडिओ पाहून नेटकरी लोटपोट

हा थरारक आणि बेजबाबदारपणाचा व्हिडिओ 'एक्स' वर '@NishadIndra1' नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ पोस्ट होताच तो वाऱ्यासारखा पसरला असून आतापर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला. कमेंट सेक्शनमध्ये नेटीझन्सनी या तरुणावर तीव्र संताप व्यक्त केला. काही युझर्संनी "याला वर्क फ्रॉम होम म्हणतात की वर्क फ्रॉम रोड?" असा उपरोधिक सवाल केला, तर काहींनी "कंपनीच्या टार्गेटच्या नादात हा तरुण स्वतःचे आयुष्यच संपवून बसेल," अशी भीती व्यक्त केली. वाहतूक पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेऊन अशा बेजबाबदार चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही आता सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com