EPFO fake link cyber fraud alert for PF account users Dainik Gomantak
देश

EPFO Cyber Fraud: EPFOच्या नावानं लिंक आली तर थांबा! PF खात्यातील पैशांवर सायबर गुन्हेगारांची नजर; एका चुकीमुळे खात्यातील पैसे होतील गायब

EPFO cyber fraud alert: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (EPFO) संबंधित सेवा वापरणाऱ्या कोट्यवधी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

Sameer Amunekar

EPFO Fraud Alert for PF Members

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (EPFO) संबंधित सेवा वापरणाऱ्या कोट्यवधी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डिजिटल व्यवहार वाढत असताना सायबर ठगांकडून PF खातेधारकांना लक्ष्य करण्याचे प्रकार वाढत आहेत. बनावट वेबसाइट, फिशिंग लिंक, SMS, ई-मेल आणि WhatsApp संदेशांच्या माध्यमातून सदस्यांकडून गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर EPFOने सदस्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

सायबर गुन्हेगार PF Balance, KYC अपडेट किंवा क्लेमच्या नावाखाली बनावट लिंक पाठवू शकतात. अशा लिंकवर क्लिक करून माहिती भरल्यास वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चुकीच्या व्यक्तींच्या हाती जाण्याचा धोका निर्माण होतो.

PFशी संबंधित कामांसाठी अधिकृत माध्यमांचाच वापर करा

EPFOशी संबंधित कोणतीही सेवा घेताना अधिकृत माध्यमांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. PF Balance तपासणे, क्लेमशी संबंधित माहिती पाहणे किंवा इतर सेवा वापरण्यासाठी अनोळखी वेबसाइटवर लॉगिन करण्याऐवजी EPFOच्या अधिकृत प्लॅटफॉर्मचा किंवा UMANG Appचा वापर करावा.

Googleवर एखाद्या सेवेचा शोध घेताना दिसणाऱ्या प्रत्येक वेबसाइटवर लगेच विश्वास ठेवू नका. सायबर ठग हुबेहूब दिसणाऱ्या वेबसाइट तयार करून वापरकर्त्यांना फसवू शकतात.

'KYC अपडेट करा' असा मेसेज आला तर सावध व्हा

सायबर फ्रॉडमध्ये बनावट संदेशांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 'तुमचा PF क्लेम अडकला आहे', 'KYC अपडेट करा', 'PF Balance मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करा' अशा स्वरूपाचे SMS किंवा WhatsApp मेसेज खातेधारकांना पाठवले जाऊ शकतात.

अशा संदेशांमधील लिंकवर क्लिक करून कोणतीही वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती भरू नये. एकदा संवेदनशील माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती गेल्यास आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो.

UAN आणि OTP कुणालाही देऊ नका

PF खाते सुरक्षित ठेवण्यासाठी UAN, पासवर्ड, OTP, बँक खाते क्रमांक किंवा इतर गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तीला देणे टाळा. फोनवरून कोणी स्वतःची ओळख EPFO अधिकारी म्हणून करून दिली आणि OTP किंवा इतर माहिती मागितली तर विशेष सावध राहा. OTP ही अत्यंत संवेदनशील माहिती असल्याने ती कोणाशीही शेअर करू नये.

वेबसाइटचा URL तपासणे गरजेचे

फिशिंग वेबसाइट ओळखणे कधीकधी कठीण असते. कारण बनावट वेबसाइटचा पत्ता अधिकृत वेबसाइटसारखा दिसू शकतो. मात्र, डोमेनच्या स्पेलिंगमध्ये एखादा अक्षराचा बदल, अतिरिक्त शब्द किंवा वेगळे URL असू शकते.

त्यामुळे लॉगिन करण्यापूर्वी वेबसाइटचा पत्ता काळजीपूर्वक तपासा. अनोळखी लिंकवरून थेट लॉगिन करण्याऐवजी अधिकृत वेबसाइट स्वतः उघडणे अधिक सुरक्षित ठरते.

फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार करा

जर चुकून एखाद्या बनावट लिंकवर क्लिक केले किंवा संवेदनशील माहिती शेअर केली असेल, तर वेळ न घालवता संबंधित यंत्रणांकडे तक्रार करणे महत्त्वाचे आहे. आर्थिक फसवणूक झाल्यास सायबर क्राइम हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधता येतो. तसेच EPFOच्या अधिकृत तक्रार निवारण माध्यमातूनही समस्या नोंदवता येते.

PFमध्ये कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळाच्या मेहनतीची बचत जमा होत असते. त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीपासून हे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ पासवर्ड पुरेसा नाही, तर सतर्कता आणि जागरूकताही तितकीच महत्त्वाची आहे. अनोळखी लिंकपासून दूर राहणे, OTP न सांगणे आणि केवळ अधिकृत माध्यमांचा वापर करणे या साध्या सवयींमुळे सायबर फसवणुकीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

SCROLL FOR NEXT