Goa Congress: काणकोणमध्ये काँग्रेसला 'बळ', 'दया' गावकरांसह समर्थकांचा प्रवेश; पक्षसंघटना मजबूतीवर भर

Umesh Daya Gaonkar joins Congress: गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे उमेश ऊर्फ दया गावकर आणि त्यांच्या समर्थकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे उमेश ऊर्फ दया गावकर आणि त्यांच्या समर्थकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काणकोणातही काँग्रेसला बळ मिळाले आहे. तळागाळातील पक्षसंघटना मजबूत होत आहे, असे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. श्रीस्थळ येथे पक्षप्रवेश कार्यक्रमात ठाकरे बोलत होते.

यावेळी काणकोण मतदारसंघातील विविध भागांतून काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून काणकोणमध्ये काँग्रेसची संघटनात्मक ताकद आणि नव्याने निर्माण झालेला उत्साह दिसून आला.

Goa Congress
Goa Politics: सत्तेसाठी विरोधकांची मोट बांधणार कोण? काँग्रेसची यात्रा, 'आप'ची रणनीती अन् विजय सरदेसाईंची महत्त्वाकांक्षा

उमेश गावकर आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत करताना गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतीक्षा नारुळकर खलप, गोवा प्रभारी आयवायसी व एनएसयूआयचे जनार्दन भंडारी, काणकोण ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष गॅस्पर कौटिन्हो तसेच काँग्रेसचे अन्य वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नेत्यांनी उमेश गावकर आणि त्यांच्या समर्थकांच्या पक्षप्रवेशामुळे काणकोणमधील काँग्रेसची तळागाळातील संघटना आणखी मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. पक्षाचे कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहचावे, असे आवाहन चोडणकर यांनी केले.

Goa Congress
Goa Cricket Team Oman Tour: गोव्याचा सीनियर क्रिकेट संघ ओमानमध्ये दाखल; दौऱ्यात दोन टी-20, तीन एकदिवसीय मिळून रंगणार एकूण 5 सामने

प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

उमेश गावकर आणि त्यांच्या समर्थकांचे स्वागत करून त्यांनी काँग्रेसच्या संघटनेसोबत एकजुटीने काम करावे, प्रत्येक घरापर्यंत पक्षाचा संदेश पोहोचवावा आणि काणकोणच्या जनतेचा आवाज अधिक बुलंद करावा, असे आवाहन नेत्यांनी केले.

उमेश गावकर आणि त्यांच्या समर्थकांच्या पक्षप्रवेशामुळे मतदारसंघातील काँग्रेसच्या संघटनात्मक उपक्रमांना आणखी गती मिळेल आणि तळागाळातील पक्षसंघटना मजबूत करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास काँग्रेस नेतृत्वाने व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com