Goa Politics: काहींवर सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण, नाव न घेता विरोधी पक्षनेत्यावर विजय सरदेसाईंची तोफ

Vijay Sardesai opposition statement: सरकार सांभाळण्याची जशी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, तशीच विरोधी पक्षांना सांभाळण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षनेत्याची आहे.
Vijay Sardesai opposition statement
Vijay Sardesai opposition statementDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : सरकार सांभाळण्याची जशी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, तशीच विरोधी पक्षांना सांभाळण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षनेत्याची आहे. मी काही विरोधी पक्षनेता नाही. एकत्रित येण्याच्या चर्चा होतात, एकत्रित हात उंचावून दाखविले जातात पण पुन्हा दुसऱ्या दिवशी ‘जैसे थे’च स्थिती. त्यामुळे काही विरोधकांवर सत्ताधारी पक्षाचे नियंत्रण आहे, असा आरोप कोणत्याही पक्षाचे अथवा नेत्याचे नाव न घेता गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

आझाद मैदानात कारापूरवासीयांसह उपोषणास बसलेल्या रामा काणकोणकर यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सरदेसाई यांनी विरोधक एकत्रित न येण्यामागील विषयावर मत मांडले. ते म्हणाले, एकत्रित येऊ शकत नसल्याने आपण एकवळे पक्ष विलीन करण्याचा निर्णय घेतला होता.

सगळे एकत्र येतात, बोलतात पण पुढे काही ठोस पाऊल घेतले जात नाही. दोन वर्षांपासून आपण प्रयत्न करीत आहोत, पण तसे काही घडताना दिसत नाही. आता जे येतील त्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले.

Vijay Sardesai opposition statement
Goa Cricket Team Oman Tour: गोव्याचा सीनियर क्रिकेट संघ ओमानमध्ये दाखल; दौऱ्यात दोन टी-20, तीन एकदिवसीय मिळून रंगणार एकूण 5 सामने

एकी दाखवली जाते मात्र...

एखाद्या आंदोलनाच्यावेळी एकत्रित येतात, एकी दाखवतात पण पुढे काहीच होत नाही. आता शेवटच्या टप्प्यात सर्व पक्ष एकत्रित येतील आणि पुढे जातील असे काही घडणार नाही. विरोधकांऐवजी सामाजिक कार्यकर्त्यांनी ती भूमिका बजावलेली आहे, हे दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com