Pulwama Dainik Gomantak
देश

पुलवामामध्ये चकमक, सुरक्षा जवानांनी एका दहशतवाद्याला केले ठार

जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) पोलिसांनी द्राबगाम परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच मोठी कारवाई केली.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीर पोलिसांनी द्राबगाम परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच मोठी कारवाई केली. सुरक्षा दलाच्या पथकाने परिसराला वेढा घातला. स्वत:ला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. माघारी परतण्याचे दहशतवांद्याचे सगळे रस्ते सुरक्षा दलांनी बंद केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या माहितीनंतर संपूर्ण परिसरात मोहीम सुरु करण्यात आली आहे. (encounter at drabgam area of pulwama police and security forces are on the job)

दरम्यान, 24 तासांपेक्षा कमी कालावधीत ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी कुलगामच्या खांडीपोरामध्ये चकमक झाली होती, ज्यामध्ये एक दहशतवादीही (Terrorist) मारला गेला होता.

श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावर बसवलेले IED निष्क्रिय केले

सुरक्षा दलांनी खोऱ्यात दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी बारामुल्ला-श्रीनगर (Srinagar) राष्ट्रीय महामार्गावर पेरण्यात आलेला आयईडी निकामी करण्यात आला. यापूर्वी आयईडीची माहिती मिळताच प्रशासनाने महामार्गावरील वाहतूक बंद केली होती. बारामुल्ला जिल्ह्यातील बुलगाम हैगाममध्ये संशयास्पद बॉक्स दिसला. घटनास्थळी पोहोचलेल्या बॉम्ब शोधक पथकाने संशयास्पद बॉक्स तपासण्यास सुरुवात केली असता तो आयईडी असल्याचे समजले. तेथून दुसऱ्या ठिकाणी हलवून पथकाने आयईडी निकामी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT