CM Hemant Soren Dainik Gomantak
देश

Jharkhand News: हेमंत सोरेन यांच्या अडचणीत वाढ, निकटवर्तीयांवर ईडीची कारवाई

CM Hemant Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांवर ईडी कारवाई करत आहे.

दैनिक गोमन्तक

Jharkhand News: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (CM Hemant Soren) यांच्या निकटवर्तीयांवर ईडी कारवाई करत आहे. ईडीने आता आमदार पंकज मिश्रा यांना रांचीमधील कथित बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. मिश्रा यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही तासांच्या चौकशीनंतर अटक केली. 8 जुलै रोजी ईडीने पंकज मिश्रा आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित एकूण 19 ठिकाणांचा शोध घेतला होता.

दरम्यान, ईडीने साहेबगंज, बरहैत, राजमहल आणि मिर्झा चौकी येथील पंकज मिश्रा आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित असलेल्या 19 ठिकाणांवर छापे टाकले होते. छाप्यादरम्यान ईडीने 19 कोटी रुपये जप्त केले होते. त्यानंतर ईडीने (ED) त्यांना तपासात सहभागी होण्यासाठी दोनदा समन्स बजावले होते, मात्र प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून ते दोन्ही वेळा आले नाहीत. मंगळवारी तिसऱ्या समन्सवर ते तपासात सामील झाले.

दुसरीकडे, या प्रकरणात, ईडीने पंकज मिश्रासह इतर अनेक आरोपींची खाती सील केली होती, ज्यात 36 कोटी रुपये जमा होते. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 अंतर्गत ही रक्कम जप्त करण्यात आल्याचे ईडीने सांगितले होते. पंकज मिश्रा हे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. या प्रकरणी ईडीने मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय IAS पूजा सिंघल आणि त्यांच्या सीएला आधीच अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali in Goa: नरकासुर वध, पाच प्रकारचे 'पोहे'; गोव्याची दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा पारंपरिक विजयोत्सव

Horoscope: घरात ऐश्वर्य आणि आनंदाचा वर्षाव, वातावरण अत्यंत मंगलमय राहील; दिवाळीच्या दिवशी कसा असेल तुमचा दिवस?

Viral Video: ट्रॅक्टरला रथासारखी चाकं... सोशल मीडियावर व्हायरल झाला भन्नाट 'जुगाड', लोक म्हणाले, "हा आहे नवा भारत"

Shubman Gill Era Begins! पहिल्याच वनडेत 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

SCROLL FOR NEXT