Jharkhand: चाईबासामध्ये नक्षलवाद्यांचा मोठा कट फसला!

झारखंडमधील चाईबासा जिल्ह्यातील जंगलात पोलीस आणि CRPF जवानांच्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान काल प्रत्येकी पाच किलो वजनाचे तीन IED जप्त करण्यात आले.
Jharkhand
JharkhandDainik Gomantak
Published on
Updated on

झारखंडमधील (Jharkhand) चाईबासा जिल्ह्यातील जंगलात पोलीस आणि CRPF जवानांच्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान काल प्रत्येकी पाच किलो वजनाचे तीन IED जप्त करण्यात आले. त्यानंतर ते जागीच निकामी करण्यात आले. सुरक्षा दलांना इजा पोहचवण्यासाठी जंगलात आयईडी लावण्यात आले होते. या प्रकरणी, चाईबासाचे पोलिस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी सांगितले की, ''1 मे रोजी कामगार दिनानिमित्त सीआरपीएफ (CRPF) 197 बटालियन आणि जिल्हा सशस्त्र दलाच्या कंपनीकडून टोंटो पोलिस (Police) स्टेशन हद्दीत सीपीआय माओवाद्यांच्या विरोधात विशेष शोध मोहीम राबवली जात होती.'' (Police and CRPF were conducting a special search operation against the Maoists in the forest in Chaibasa district)

वास्तविक, मतकोरच्या घनदाट जंगलात आयईडी पेरुन बॉम्ब लपवल्याची माहिती मिळाली होती. पथकाच्या तपासात दगडांमधून प्रत्येकी 5 किलोचे तीन बॉम्ब सापडले. बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने तिन्ही आयईडी घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नक्षलवाद्यांविरुद्ध पोलिस आणि सीआरपीएफ टीमची संयुक्त कारवाई सुरुच राहणार आहे.'

गेल्या महिन्यात चाईबासामध्ये 14 किलो वजनाचे अर्धा डझन आयईडी जप्त करण्यात आले होते

गेल्या मार्च महिन्यात चाईबासा जिल्ह्यातील टेबोच्या हलमाड जंगलात नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेले चौदा किलो वजनाचे अर्धा डझन आयईडी बुधवारी सुरक्षा दलांनी जप्त करुन नष्ट केले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाईबासा पोलिसांना तेबा पोलीस स्टेशन अंतर्गत हलमाड आणि रोगटोच्या जंगलात एक इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (IED) लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, जिल्हा पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल (CPRF) च्या 60 व्या तुकडी आणि बॉम्ब निकामी पथकाने संयुक्तपणे पोलीस अधीक्षक, चाईबासा यांच्या निर्देशानुसार विशेष शोध मोहीम राबविली. यामध्ये एकूण सहा आयईडी, एक टिफिन बॉम्ब आणि जंगलात लपवून ठेवलेले कॉर्टेक्स केबलचे नऊ बंडल जप्त करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com