JNU University  Dainik Gomantak
देश

JNU विद्यापीठात पुन्हा हाणामारी; रामनवमी दिवशी केलेला मांसाहार ठरले निमित्त

जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष एन साई बालाजी यांनी एका ट्विटमध्ये सांगीतले की, अभाविपचे लोक कावेरी वसतिगृहात विद्यार्थ्यांना मांसाहार करण्यापासून रोखत असल्याचा दावा केल्यावर वाद सुरू झाला.

दैनिक गोमन्तक

दिल्ली: दिल्लीतील जेएनयू पुन्हा वादात सापडले आहे. यावेळी रामनवमीच्या दिवशी मांसाहार बंद करणे आणि पूजेत अडथळा आणल्याच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे हा वाद आणखी वाढला, ज्याचे रुपांतर किरकोळ भांडणातून रक्तरंजित झाले. रविवारी संध्याकाळी जेएनयूच्या कावेरी वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये संघर्ष झाला, त्यानंतर दगडफेक झाली, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. (eating meat on Ram Navami became an occasion for Fight at JNU University)

जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष एन साई बालाजी यांनी एका ट्विटमध्ये दावा केला की, अभाविपचे लोक कावेरी वसतिगृहात विद्यार्थ्यांना मांसाहार (Non-Veg) करण्यापासून रोखत असल्याचा दावा केल्यावर वाद सुरू झाला. यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत मारहाणीची बातमी आली. साई बालाजीने ट्विटरवर लिहिले की, "ABVP च्या गुंडांनी कावेरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नॉनव्हेज खाण्यापासून रोखले. जेएनयूचे कुलगुरू या गुंडगिरीचा निषेध करणार का? आता विद्यार्थ्यांच्या जेवणाचाही निर्णय होणार का? मेसच्या सेक्रेटरीलाही मारहाण करण्यात आली आहे."

दुसरीकडे, अभाविपने हे आरोप फेटाळून लावले असून रामनवमीच्या दिवशी वसतिगृहात आयोजित केलेल्या पूजेच्या कार्यक्रमात एका संघटनेच्या विद्यार्थ्यांनी (Student) अडथळा आणण्याचे कृत्य केल्याचा दावा केला आहे.

अभाविपने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जेएनयूच्या (JNU University) विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त कावेरी वसतिगृहात पूजा आणि हवनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पूजेला जेएनयूचे विद्यार्थी मोठ्या संख्येने जमले होते. त्याचवेळी एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येऊन पूजेत अडथळा आणल्याबद्दल आंदोलन सुरू केले.

दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक करून संबंधित सदस्यांना जखमी केल्याचा आरोप केला आहे. यानंतर जेएनयू कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या कॅम्पसमधील परिस्थिती नियंत्रणात असली तरी दोन्ही गटातील विद्यार्थ्यांची निदर्शने आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण तापले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT