Earthquake In Himachal Pradesh: Dainik Gomantak
देश

Earthquake In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टल स्केलवर 3.4 तीव्रता

या भूकंपाची तीव्रता रिश्टल स्केलवर ३.४ एवढी होती.

Puja Bonkile

Earthquake In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पीती जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टल स्केलवर ३.४ एवढी होती.

अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्त हानीची माहिती नाही.

  • भूकंपाचे कारण काय?

पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच. कवच आणि वरच्या आवरणाच्या गाभ्याला लिथोस्फीअर म्हणतात.

आता हा 50 किलोमीटर जाडीचा थर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या अनेक विभागांमध्ये विभागला गेला आहे. म्हणजेच पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग 7 टेक्टोनिक प्लेट्सने बनलेला आहे.

या प्लेट्स कधीही स्थिर नसतात, त्या सतत फिरत राहतात, जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या दिशेने जातात तेव्हा त्या एकमेकांवर आदळतात.

काही वेळा या प्लेट्सही तुटतात. त्यांच्या धडकेमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते, त्यामुळे परिसरात एकच धक्के जाणवतात.

कधी कधी हे धक्के खूप कमी तीव्रतेचे असतात त्यामुळे ते जाणवतही नाहीत. कधीकधी ते इतक्या तीव्रतेचे असतात की पृथ्वीचा स्फोट होतो.

  • भूकंप आल्यावर काय करावे आणि काय करू नये?

धक्के जाणवल्यास ताबडतोब जमिनीवर बसा आणि आपले डोके खाली टेकवा.

मजबूत टेबल किंवा फर्निचरच्या आवरणाखाली स्वतःचा बचाव करावा.

याशिवाय घरातील वडीलधाऱ्यांची आणि मुलांची विशेष काळजी घ्यावी. 

त्यांना प्रथम बचावाच्या पद्धती सांगून त्यांचे संरक्षण करा. 

जर भूकंपाचा धक्का खूप तीव्र असेल तर काळजीपूर्वक घरातून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानावर किंवा रस्त्यावर जावे. 

याशिवाय भूकंपाच्या वेळी काच, खिडकी, पंखा किंवा झुंबर इत्यादी जड आणि पडणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बोरकरांची खोलकरांना नोटीस; 3 दिवसांत माफी मागा, अन्यथा 6 कोटींचा मानहानी खटला!

WPL 2027 चं बिगुल वाजलं! पहिल्याच सामन्यात स्मृतीची 'आरसीबी' भिडणार हरमनप्रीतच्या 'मुंबई इंडियन्स'शी; पाहा स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक!

ढिंग टांग: ट्रम्प कहीं नहीं जाएगा..!

India New Visa Rules 2026: परदेशी पर्यटकांसाठी खूशखबर! भारतातील व्हिसा प्रक्रिया होणार अत्यंत सोपी आणि वेगवान; केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

VIDEO: खेळाडूच नव्हे तर प्रशिक्षक, स्टाफ अन् बॉल बॉयही भिडले! LIVE सामन्यात तुफान हाणामारी; रेफ्रीने दाखवली तब्बल 51 रेड कार्ड

SCROLL FOR NEXT