Earthquake Dainik Gomantak
देश

उत्तर भारतात 8 रिश्टर स्केलचा भूकंप होऊ शकतो, धक्क्यांसाठी तयार राहा; शास्त्रज्ञांचा इशारा

Earthquake: नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआर, यूपी, बिहार, मध्यप्रदेशसह उत्तर भारतात जाणवले.

Manish Jadhav

Earthquake in Nepal Indian Scientist Warns North India Prepared For More Shocks: नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआर, यूपी, बिहार, मध्यप्रदेशसह उत्तर भारतात जाणवले. नेपाळमध्ये गेल्या एका महिन्यातील हा तिसरा भूकंप आहे.

दरम्यान, भारतीय भूकंपशास्त्रज्ञ अजय पॉल यांनी इशारा दिला की, उत्तर भारताने आणखी धक्क्यांसाठी तयार राहावे. ते म्हणाले की, हिमालयीन भागात भूकंपाचा पट्टा सक्रिय आहे. नेपाळमधील भूकंपाचा केंद्रबिंदू अभ्यासला असता, या भागात ऊर्जा सोडणारे मोठे क्षेत्र असल्याचे समोर आले.

शास्त्रज्ञ अजय पॉल यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील (Nepal) डोटीच्या आसपास होता. नोव्हेंबर 2022 मध्येही येथे 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यामध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले.

3 ऑक्टोबरलाही नेपाळच्या या भागात भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले होते. हा भाग नेपाळच्या अगदी मध्यभागी आहे. वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे अनेक भूकंपाचे पट्टे सक्रिय असल्याचे दिसून येते.

त्यामुळे भूकंप सातत्याने होत आहेत

यापूर्वी, अनेक भूवैज्ञानिकांनी हिमालयात कधीही मोठा भूकंप होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यांनी सांगितले की, या भागात भारतीय टेक्टोनिक प्लेट सतत उत्तरेकडे सरकत आहे.

त्याचवेळी, ती युरेशियन प्लेटवर देखील आदळत आहे, ज्यामुळे जमिनीवर दबाव तयार होत आहे आणि जेव्हा दाब उर्जेच्या स्वरुपात रिलीज होतो तेव्हा भूकंप होतो. अजय पॉल यांनी यापूर्वी वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयनमध्ये काम केले आहे.

अशा प्रकारे हिमालयाची निर्मिती झाली

त्यांनी पुढे सांगितले की, इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यातील टक्कर 40 ते 50 दशलक्ष वर्षांपूर्वी सुरु झाली होती. इंडियन प्लेट हिंद महासागरातून उत्तरेकडे सरकत असून या टक्करमुळे हिमालयाची निर्मिती झाल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. इंडियन आणि युरेशियन प्लेट्सच्या टक्करमुळे हिमालयाची उंची सतत वाढत आहे.

शास्त्रज्ञ अजय पॉल म्हणाले की, सततचा दाब मोठ्या भूकंपाने रिलीज होईल. असे झाल्यास आठपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो जो अत्यंत विनाशकारी ठरेल. मात्र, अचूक अंदाज वर्तवण्याची पद्धत नसल्याने एवढा मोठा भूकंप प्रत्यक्षात कधी येणार हे कळणे कठीण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

SCROLL FOR NEXT