Earthquake
EarthquakeDainik Gomantak

Earthquake: भूकंपाने मेघालय हादरले, रिश्टर स्केलवर 5.2 ची नोंद

Earthquake in Meghalaya: मेघालय राज्यात सोमवारी सायंकाळी उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले.

Earthquake in Meghalaya: मेघालयमध्ये सोमवारी सायंकाळी उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मेघालयमध्ये सोमवारी संध्याकाळी 6:15 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर स्केल इतकी होती. पश्चिम बंगाल आणि आसामच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे.

अद्याप नुकसानीची नोंद नाही

मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील डोंगराळ राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू मेघालयातील उत्तर गारो पर्वतांमध्ये सुमारे 10 किमी खोलवर असल्याचे वृत्त आहे. मात्र, आतापर्यंत या भूकंपामुळे कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

एका अहवालात असेही म्हटले आहे की, मेघालय (Meghalaya), आसाम, मणिपूर आणि मिझोराम या उत्तर-पूर्व राज्यांमध्ये अलीकडच्या काळात अनेक वेळा भूकंप झाले आहेत. त्यामुळे या राज्यांतील नागरिकांची चिंता वाढली आहे.

24 तासांत दुसरा भूकंप, यापूर्वी हरियाणा हादरले होते

दरम्यान, 24 तासांत भूकंपाची (Earthquake) ही दुसरी घटना आहे. याआधी रविवारी उशिरा हरियाणातील रोहतक जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रोहतकमध्ये भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.6 इतकी मोजली गेली होती.

इथेही भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरियाणातील भूकंपाचा केंद्रबिंदू रोहतकपासून सात किमी अंतरावर असलेल्या खेडी गावात जमिनीपासून 5 किमी खाली असल्याचे सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com