Due to Digvijay Singh's Panauti post, the controversy between Congress and BJP has been rekindled. Dainik Gomantak
देश

Panauti Row: "भाजपने मोदींना 'पनौती' का मानले?" दिग्विजय सिंहांच्या पोस्टमुळे कॉंग्रेस-भाजप वाद आणखी पेटला

PM Modi: "पनौती" चा अर्थ काय? मी शोधले. तो एक नकारात्मक शब्द आहे. जेव्हा काही काम अपूर्ण राहते तेव्हा त्या व्यक्तीला 'पनौती' म्हणतात, दिग्विजय यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Ashutosh Masgaunde

Due to Digvijay Singh's Panauti post, the controversy between Congress and BJP has been rekindled:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थानमधील एका निवडणूक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'पनौती' म्हटले. यावर भाजप नेते संतापले आहेत.

भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्या भाषेचे वर्णन असभ्य आहे. तसेच त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

यावर आता माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य समोर आले आहे.

दिग्विजय सिंह यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “पनौती म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ मी शोधला. तो एक नकारात्मक शब्द आहे. जेव्हा काही काम अपूर्ण राहते तेव्हा त्या व्यक्तीला 'पनौती' म्हणतात. पनौती हा शब्द अशा व्यक्तीसाठी वापरला जातो जो आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी दुर्दैवी किंवा वाईट बातमी घेऊन येतो, म्हणूनच त्याला नकारात्मक शब्द म्हणतात.”

दिग्विजय यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले, "वर्ल्ड कप सुरू होताच हा शब्द सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. पनौती कोणाला म्हटले होते? स्टेडियममध्ये हजारो लोक होते. भाजपने मोदींना "पनौती" का मानले? त्यांच्या दृष्टीने ते तर जागतिक नेते आहेत.”

"पनौती" चा अर्थ काय? मी शोधले. तो एक नकारात्मक शब्द आहे. जेव्हा काही काम अपूर्ण राहते तेव्हा त्या व्यक्तीला 'पनौती' म्हणतात.

पनौती हा शब्द अशा व्यक्तीसाठी वापरला जातो जो आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी दुर्दैवी किंवा वाईट बातमी घेऊन येतो, म्हणूनच तो नकारात्मक शब्द मानला जातो. या आशयाची पोस्ट दिग्विजय सिंह यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?

राहुल गांधी जालोरमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करत होते. ते पीएम मोदींवर टीका करत होते, त्याचवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पनौती-पनौतीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

हे ऐकून राहुल गांधींनी आपले भाषण थांबवले आणि म्हणाले की, आपली पोरं विश्वचषक जिंकू शकली असती, पण पनौतीने त्यांना हरवले. जनतेला ही पनौती कोण आहे हे माहीत आहे, पण टीव्हीवाले ते सांगणार नाहीत." यानंतर राहुल यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT