DU professor Ratan Lal Dainik Gomantak
देश

ज्ञानवापी प्रकरण: डीयूचे प्राध्यापक रतन लाल यांना जामीन मंजूर

ज्ञानवापी प्रकरणात एफबी पोस्टवरुन अटक करण्यात आलेले डीयूचे प्राध्यापक रतन लाल यांना जामीन मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक रतन लाल (DU Professor Ratan Lal) यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी तीस हजारी न्यायालयात हजर केले. वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद संकुलात शिवलिंग सापडल्याच्या दाव्यावरुन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रतन यांच्या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, रतन लाल यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, असोसिएट प्रोफेसर रतन लाल यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 153A (धर्म, जात, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरं तर त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदाल यांनी तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, 'रतन लाल यांनी नुकतेच 'शिवलिंग'वरुन अपमानास्पद आणि चिथावणीखोर ट्विट केले होते. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. मात्र आता न्यायालयाने (Court) त्यांना दिलासा दिला आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT