Donkey Dainik Gomantak
देश

कतरिना 1 लाखात, सलमान नावाचे खेचर 60 हजारात विकले; जाणून घ्या चित्रकूटच्या जत्रेची खासियत

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील चित्रकूटमध्ये तीन दिवस गाढव आणि खेचरांची जत्रा भरते. दिवाळीनंतर ही जत्रा सुरु होते.

दैनिक गोमन्तक

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील चित्रकूटमध्ये तीन दिवस गाढव आणि खेचरांची जत्रा भरते. दिवाळीनंतर ही जत्रा सुरु होते. या जत्रेत गाढवे, खेचर लांबून विकायला आणले जातात. या जत्रेत 10 हजारांहून अधिक गाढवे आणि खेचर आल्याचे मुन्ना प्रधान सांगतात. यामध्ये कतरिना आणि सलमान नावाच्या खेचरांना चढ्या भावाने विकण्यात आले. कतरिनाची किंमत 1 लाख तर सलमानची किंमत 60 हजार होती. याशिवाय सुष्मिता, आमिर, गब्बर आदी नावाच्या खेचरांचीही विक्री होते.

बहुतांश लोक उत्तर प्रदेशातून आलेले आहेत

सतना जिल्ह्यातील चित्रकूट येथे ही जत्रा भरते. परंतु उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लोक त्यात जास्त रस घेतात. बांदा येथून इथे आलेल्या ओमप्रकाश यांनी सांगितले की, जत्रेतील बहुतांश लोक उत्तर प्रदेशातील आहेत. मी 15 वर्षांपासून इथे येत आहे. ओमप्रकाश पुढे म्हणाले की, 'जत्रेत अनेक प्रकारचे खेचरे आणण्यात आली आहेत.'

गाढवापेक्षा खेचर जास्त महाग

जत्रेत अनेक ठिकाणाहून खरेदीदारही येतात. त्यांना निरोगी गाढवे आणि खेचर कमी किमतीत मिळतात. त्यामुळेच लोक येथे गाढवे, खेचर विकण्यासाठी येतात. फतेहपूरहून आलेले गाढव व्यापारी फयाज सांगतात की, 'चित्रकूटच्या जत्रेत गाढवांना चांगला भाव मिळतो. याशिवाय, आमच्या येण्या-जाण्याच्या खर्चाव्यतिरिक्त आम्हाला चांगली किंमत मिळते. मात्र यावर्षी, खेचरांना मागणी जास्त तर गाढवांची मागणी कमी आहे. जिथे खेचर 40 ते 50 हजारात विकले जाते, तिथे गाढवांची किंमत 10-15 हजारांपर्यंत राहते.'

गाढव मेळ्याचे स्थानिक कंत्राटदार सनी पांडे यांनी सांगितले की, 'चित्रपटातील नावे केवळ आकर्षणासाठी ठेवण्यात आली आहेत. ही औरंगजेबाच्या काळातील जत्रा आजही सुरु आहे. लोक सांगतात की, औरंगजेब जेव्हा युद्धासाठी जात होता, तेव्हा तो मंदाकिनी किनाऱ्यावर विश्रांतीसाठी थांबला होता. त्याच्या सैन्यात आजारी पडलेली खेचर आणि गाढवेही होती, त्यांना विकण्यासाठी आणि नवीन गाढवे विकत घेण्यासाठी जत्रा भरवली जात होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात पोट भरणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणावर प्राणघातक हल्ला; झारखंडच्या संशयिताला पणजीत अटक

Goa Today News Live: विद्यापीठ निवडणूक रद्द; एनएसयुआयचा विरोध

GOA vs UP: गोव्याचा युवा महिला संघ पुन्हा पराभूत, हर्षिताचे अर्धशतक व्यर्थ; उत्तर प्रदेश पाच विकेटने विजयी

Bicholim: डिचोली तालुक्यात भाजी, मिरची लागवडीची लगबग; दीडशेहून अधिक हेक्टर क्षेत्रात उत्पादन शक्य

Mapusa: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत कमकुवत, शासनाकडून दखल नाही; कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका

SCROLL FOR NEXT