Rajasthan: गेहलोत सरकारच्या सर्व मंत्र्यांनी दिला राजीनामा

राजस्थानमधील गेहलोत सरकारमधील (Gehlot Government) सर्व मंत्र्यांनी मोठ्या फेरबदलाच्या चर्चेदरम्यान शनिवारी संध्याकाळी राजीनामा दिला.
Ashok Gehlot
Ashok GehlotDainik Gomantak

राजस्थानमधील गेहलोत सरकारच्या सर्व मंत्र्यांनी मोठ्या फेरबदलाच्या चर्चेदरम्यान शनिवारी संध्याकाळी राजीनामे दिले. यानंतर रविवारी दुपारी दोन वाजता पक्ष कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. काँग्रेसचे राजस्थान प्रभारी अजय माकन आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंत्र्यांशी या विषयावर चर्चा केली. यामध्ये रघु शर्मा आणि गोविंद सिंग दोतासरा हे देखील उपस्थित होते. हरीश चौधरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चंदीगडमध्ये हजर होते. यापूर्वी सरकारमध्ये एकापेक्षा जास्त पदे असलेल्या तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. यामध्ये शिक्षण मंत्री गोविंद सिंग दोतासरा, महसूल मंत्री हरीश चौधरी आणि आरोग्य मंत्री रघु शर्मा यांचा समावेश आहे. या तिघांनीही सोनिया गांधींना पत्र पाठवून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.

Ashok Gehlot
इंदूर स्वच्छता सर्वेक्षणात सलग पाचव्यांदा आघाडीवर

काँग्रेस हायकमांडने राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. आता रविवारी नवा मंत्री करण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. त्यापूर्वीच दुपारी दोन वाजता पीसीसी कार्यालयात मंत्र्यांच्या नावांची घोषणा केली जाईल. मंत्रिमंडळ फेरबदलाला हायकमांडने मान्यता दिली आहे. 2023 मध्ये होणीरी विधानसभा निवडणुक लक्षात घेऊन हे फेरबदल केले जात आहेत. त्यामुळे गेहलोत मंत्रिमंडळ पूर्णपणे नवीन दिसणार आहे. यापूर्वी तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. शनिवारी संध्याकाळी संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला.

पोटनिवडणुकीत चांगल्या कामगिरीनंतर होणारे बदल

राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ फेरबदल करण्यात आला आहे. परिवहन मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारलेले प्रताप सिंह खाचरियावास यांनी सांगितले की, बैठकीत सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले, गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. ते पुढे म्हणाले, “आम्हाला रविवारी दुपारी 2 वाजता पीसीसी कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले आहे. जिथे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, एआयसीसी (All India Congress Committee) सरचिटणीस अजय माकन आणि पीसीसी (Pradesh Congress Committee) प्रमुख गोविंद सिंग दोतसरा यांना उपस्थित राहणारप आहेत.

यांना मंत्रीपद मिळू शकते

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात एकमत झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. सचिन पायलट गटातून हेमाराम चौधरी, ब्रिजेंद्र ओला, दीपेंद्र सिंह शेखावत, रमेश मीणा आणि मुरारीलाल मीणा यांना मंत्रीपद मिळू शकते. त्याचवेळी, या मंत्रिमंडळ विस्तारात जे आमदार बसपापासून फारकत घेऊन गेहलोत सरकारला पाठिंबा देत आहेत, त्यांनाही मंत्रिपदाची आशा आहे. गेहलोत कॅम्पमधून ज्यांना मंत्रीपद मिळू शकते, त्यात बसपचे राजेंद्र गुढा, अपक्ष महादेव खंडेला, सन्यम लोढा आणि काँग्रेसचे महेंद्रजित सिंग मालवीय, रामलाल जाट, मंजू मेघवाल, जाहिदा खान आणि शंकुतला रावत यांच्या नावांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com