DGGI Serves Biggest Tax Notice In Indian Tax History To Dream 11. Dainik Gomantak
देश

Dream11 ला इतिहासातील सर्वात मोठी टॅक्स नोटीस

DGGI ने अनेक गेमिंग कंपन्यांना कर नोटीस जारी केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी अप्रत्यक्ष कर नोटीस ड्रीम 11 ला पाठवण्यात आली आहे.

Ashutosh Masgaunde

DGGI Serves Biggest Tax Notice In Indian Tax History To Dream 11:

ऑनलाइन गेमिंग कंपनी ड्रीम 11 ला भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रकमेची इनडायरेक्ट टॅक्स नोटीस बजावण्यात आल्याची माहीती समोर आली आहे.

इकोनॉमीक टाइम्सच्या अहवालानुसार, DGGI ने Dream 11 ला सुमारे 25,000 कोटी रुपयांची कर नोटीस जारी केली आहे. तर मनीकंट्रोलच्या म्हणण्यानुसार, ड्रीम 11 ला 40,000 कोटी रुपयांची कर नोटीस पाठवण्यात आली आहे.

या कंपन्यांचाही यादीत समावेश

कॅसिनो आणि हॉटेल्सची मालकी आणि संचालन करणारी भारतीय गेमिंग आणि हॉस्पिटॅलिटी कंपनी असणाऱ्या डेल्टो कॉर्पला 16,822 कोटी रुपयांची कर नोटीस जारी करण्यात आली आहे.

यापूर्वी गेम क्राफ्टकडून 21,000 कोटी रुपयांची जीएसटीची मागणी करण्यात आली होती, ज्यासाठी कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

या प्रकरणी सप्टेंबरच्या अखेरीस अंतिम सुनावणी होऊ शकते. मात्र, ६ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय दिला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेम्स प्ले 24×7 ला 20,000 कोटी रुपयांची कर नोटीस (रम्मी सर्कल आणि माय 11 सर्कल) पाठवण्यात आली आहे. तर हेड डिजिटल वर्क्सकडे 5000 कोटी रुपयांच्या कराची मागणी केली आहे.

एक लाख कोटी रुपयांचा जीएसटी वसूली होऊ शकते

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, DGGI ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा कर गोळा करू शकतो. ड्रीम 11 आणि हेड डिजिटल वर्क्स यांनी या प्रकरणी कोणतेही वक्तव्य दिलेले नाही.

मात्र, ड्रीम 11 ने या नोटीसबाबत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचेही बोलले जात आहे. शुक्रवार ते सोमवारपर्यंत 7 गेमिंग कंपन्यांना कराच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

RMG Apps रडारवर

मुंबई DGGI एक वर्षाहून अधिक काळ RMG Apps ची तपासणी करत आहे आणि चौकशीदरम्यान त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. आकारण्यात आलेल्या जीएसटीला विरोध करत कंपन्यांनी अधिकाऱ्यांसमोर निवेदने दिली आहेत.

"तथापि, अलीकडील GST अधिसूचनेनंतर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, ज्याने ऑनलाइन गेमवर लावलेल्या बेट्सच्या पूर्ण दर्शनी मूल्यावर 28% GST निश्चित केला आहे.

कारणे दाखवा नोटीस जारी केल्याच्या घटनेत निर्णय अधिकार्‍यासमोर अपील करण्याचा कंपन्यांकडे पर्याय उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: नावेलीत दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण

मडगावात दाखल होणार 'राम दिग्विजय रथयात्रा'! पर्तगाळ मठाच्या वर्धापन वर्षानिमित्त होणार आगमन; कुठे घ्याल दर्शन? वाचा माहिती

Panaji Politics: 'पणजीवासीय साथ देतील याची खात्री'! पर्रीकर यांचे ‘मनपा’साठी ‘एकला चलो रे’; भाजपचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याने पवित्रा

Konkan Railway: कोकण रेल्वे गाड्यांना रोज होतोय उशीर, 1 ते 3 तास होतोय विलंब; संतप्त प्रवाशांनी लिहिले महामंडळाला पत्र

Goa Politics: खरी कुजबुज; महेश मांजरेकरांचा गोवा

SCROLL FOR NEXT