'Gen Z'च्या पाकिटावर अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टचा डोळा, तरुण ग्राहकांसाठी दोन्ही कंपन्यांच्या पायघड्या

"आजपासून 10-15 वर्षांनी, आम्ही आज जे आहोत त्यापेक्षा त्या काळात आम्हाला अधिक सुसंगत व्हायचे आहे. स्पॉयल त्या दिशेने उचलेले एक पाऊल आहे. पुढे भविष्यात हीच Gen Z संपूर्ण कुटुंबासाठी निर्णय घेण्यात खूप मोठी भूमिका बजावणार आहे.”
Amazon, Flipkart targets 'Gen Z' wallet, both companies pitch for younger consumers.
Amazon, Flipkart targets 'Gen Z' wallet, both companies pitch for younger consumers.Dainik Gomantak
Published on
Updated on

Amazon, Flipkart targets 'Gen Z' wallet, both companies pitch for younger consumers:

वॉलमार्टचे फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन Gen Z तरुणांच्या माध्यमातून मोठा व्यवसाय मिळविण्यासाठी स्पर्धा करत आहेत. एप्रिलमध्ये अ‍ॅमेझॉनच्या 'नेक्स्ट जेन' स्टोअरच्या लाँचला फ्लिपकार्टने Gen Z ग्राहकांसाठी अ‍ॅप-इन-अ‍ॅप फॅशन प्लॅटफॉर्म स्पॉयलद्वारे उत्तर दिले आहे.

या तरुण आणि चंचल स्वभावाच्या ग्राहकांना प्लॅटफॉर्मवर सतत खेचत राहण्यासाठी वेळोवेळी अ‍ॅपचे स्वरूप बदण्याची गरज असते.

यामध्ये नवनवीन ट्रेंडचा फायदा घेण्यासाठी झटपट डिझाइन पावले उचलण्याची गरज असते. यासाठी चांगले तंत्रज्ञान आणि खोल खिशात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यात Flipkart आणि Amazon या Gen Z सेगमेंटमध्ये दुप्पट गुंतवणूक करत आहेत.

"आज फ्लिपकार्ट फॅशनचे 25% पेक्षा जास्त ग्राहक Gen Z मधील आहेत. आजपासून पुढे 10-15 वर्षांनी, आम्ही आज जे आहोत त्यापेक्षा त्या काळात आम्हाला अधिक सुसंगत व्हायचे आहे आणि स्पॉयल त्या दिशेने उचलेले एक पाऊल आहे. पुढे भविष्यात हीच Gen Z संपूर्ण कुटुंबासाठी निर्णय घेण्यात खूप मोठी भूमिका बजावणार आहे,” असे फ्लिपकार्ट फॅशनचे उपाध्यक्ष संदीप करवा यांनी सांगितले.

Amazon, Flipkart targets 'Gen Z' wallet, both companies pitch for younger consumers.
Smart TV Market: किमती अन् फीचर्स ठरताहेत गेम चेंजर, भारतातील स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये विक्रमी वाढ

अ‍ॅमेझॉन फॅशन इंडियाचे प्रमुख आणि संचालक सौरभ श्रीवास्तव म्हणतात, भविष्यात शॉपिंगवर Gen Z चा नक्कीच प्रभाव पडणार आहे. खरं तर, ई-कॉमर्स फर्म यूजर्ससाठी शॉपिंगचा अनुभव वैयक्तिकृत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) वापरत आहे.

"Gen Z ग्राहक आउटफिट बिल्डर, व्हर्च्युअल ट्राय-ऑन सारख्या ऑनलाइन शॉपिंग सोल्यूशन्सचा सक्रियपणे स्वीकार करत आहे. त्यांना खरेदी करताना काय घ्यायचे आणि काय नाही याचा निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी तंत्रज्ञान हे एक साधन आहे असे ते समजतात. आम्ही दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि इतर सारख्या महानगरीय बाजारपेठांमधून याची वाढती मागणी पाहत आहोत," श्रीवास्तव म्हणाले.

Amazon, Flipkart targets 'Gen Z' wallet, both companies pitch for younger consumers.
Deep Kalra: 9 ते 5 च्या नोकरीला कंटाळला, मग काय पट्ट्याने उभी केली चक्क 22 हजार कोटींची कंपनी

फ्लिपकार्टच्या स्पॉयलमध्ये सध्या फॅशन कॅटेगरी लॉंच करण्यात आली असली तरी, पुढील दोन तिमाहींमध्ये आणखी कॅटेगरी जोडल्या जाण्याची अपेक्षा आहे. कंपनी स्केटबोर्ड, हेल्मेट यासारख्या वस्तू विकण्याचा विचार करत आहे.

"फ्लिपकार्टमधील फॅशन स्पेस हे ग्राहक मिळवण्याचे एक इंजिन आहे. कारण ग्राहक सहसा फॅशनद्वारे त्यांची पहिला ई-कॉमर्स ऑर्डर करुन पाहत असतात.," असे फ्लिपकार्टचे संदीप कारवा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com