Petal Gahlot Dainik Gomantak
देश

उद्धवस्त रनवे आणि जळालेल्या इमारती विजय वाटत असेल तर त्यांनी त्याचा आनंद घ्यावा; 3 मिनिटांत भारताने पाकच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला Watch Video

India at UNGA Speech Video: जागतिक दहशतवादी ओसामा बिन लादेनला पाकिस्तानने दशकभर पोसले होते हेही विसरता येणार नाही.

Pramod Yadav

India at UNGA Speech Video

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या शिखर परिषदेत भारताने पाकिस्तानचा खोटा बुरका टराटरा फाडला. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेले खोटे दावे खोडून काढत भारताने त्यांना आरसा दाखवला. उद्धस्त धावपट्टी, दहशतवादी तळ जर विजय वाटत असेल तर पाकिस्तानने त्याचा आनंद घ्यावा. तसेच, शांती संबंधित कोणतीही चर्चा द्विपक्षीयच होईल, असे भारताने स्पष्ट केले. भारताकडून पेटल गेहलोत यांनी बाजू मांडली.

"पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुन्हा एकदा दहशतवादाचा उदोउदो केला. यात आश्चर्य बाळगण्याचे गरज देखील नाही कारण दहशतवाद त्यांच्या परकी धोरणाचा केंद्रबिंदू आहे. कितीही नाटक केले किंवा खोटं बोलले तरी सत्य लपून राहत नाही.

पाकिस्तानची संबंधित दहशतवादी संघटनेने भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर गोळीबार करुन त्यांना ठार केले. पाकिस्तान अनेक वर्षांपासून देशात दहशतवादाला थारा देण्यासह इतर देशांत दहशतवादी कारवाई करण्यास पाठवत आहे."

"जागतिक दहशतवादी ओसामा बिन लादेनला पाकिस्तानने दशकभर पोसले होते हेही विसरता येणार नाही. अलिकडेच पाकिस्तानी मंत्र्यांनी दहशतवादी कारवाया करत असल्याचे उघडपणे मान्य केले आहे. पाकिस्तानचा खोटारटेपणा आणि दुटप्पी पुन्हा एकदा समोर आला असून, यावेळी पंतप्रधानांनी देखील यात उडी घेतली आहे," असे म्हणत गेहलोत यांनी भूमिका स्पष्ट केली

"भारतीय सैन्यांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये बहावलपूर आणि मुरिदके येथील दहशतवादी तळांना नष्ट करण्यात आले आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला. याचे फोटो, व्हिडिओ समाज माध्यमांवर उपलब्ध आहेत. पाकिस्तानी सैन्य आणि नागरिकांनी दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला हजेरी लावल्याचा पुरावा देखील समोर आला आहे. ०९ मे पर्यंत पाकिस्तानी पंतप्रधान भारताला धमकी देत होते पण, १० मे रोजी त्यांच्या सैन्याने सीझफायरसाठी भारताकडे भीक मागितली."

"पाकचे रनवे आणि दहशतवादी तळ उद्धवस्त झाल्याचे फोटो, व्हिडिओ समोर आले आहेत. उद्धवस्त रनवे आणि जळालेल्या इमारती त्यांना विजय वाटत असेल तर पाकिस्तानने त्याचा आनंद घ्यावा. पाकिस्तानने भारतात अनेकवेळा दहशतवादी कारवाया केल्या आहेत आणि आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

"भारतासोबत शांतीवर्ता करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या पंतप्रधानांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, ते खरचं शांती वार्ता करण्यासाठी गंभीर असती तर, त्यांना सर्वात अगोदर दहशतवादाला पोसने बंद करावे, तसेच सर्व दहशतवादी तळ बंद करुन भारताला हवे असणारे दहशतवादी आम्हाला सोपवावेत. नैतिकता आणि विश्वासाच्या बाता करणाऱ्या पाकिस्तानने स्वत: आरशात पाहावे."

"भारत आणि पाकिस्तानमध्ये वादातीत असणारा कोणताही मुद्दा द्विपक्षीय चर्चेनेच सोडवला जाईल, यामध्ये कोणत्याही तिसऱ्याची लुडबूड सहन केली जाणार नाही. दहशतवादी आणि त्यांचा पुरस्कार करणाऱ्यांसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अणू धमकीच्या नावाखाली दहशतवाद पोसण्याची कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. भारत अशा धमक्यांना भीक घालणार नाही. दहशतवादाला अजिबाता थारा नाही, ही आमची भूमिका आहे,"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

Ranji Trophy 2025: हुर्रे! गोव्याची दणदणीत विजयी ‘दिवाळी’, चंडीगडला नमवले; पाहुणा 'ललित' सामन्याचा मानकरी

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

SCROLL FOR NEXT