Goa Politics: '2027 मध्ये भाजपचे 27 आमदार येणारच'! मुख्यमंत्र्यांचा ठाम विश्वास; तेंडुलकरांचे केले कौतुक

CM Pramod Sawant: माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी तेंडुलकर यांना केक भरविला.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी तेंडुलकर यांना केक भरविला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, विनय तेंडुलकर हे सामान्य कार्यकर्ता नसून भाजपचे एक बलाढ्य नेते आहेत. २०१९ साली मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या सहकार्यामुळे मी मुख्यमंत्री पदावर अजून कायम आहे.

सावर्डेसारख्या ग्रामीण मतदारसंघातून एक पैसा खर्च न करता तेंडुलकर आमदार झाले, ही ताकत फक्त भाजपमध्येच आहे.

दाभाळ ते दिल्लीपर्यंत मजल मारणारे तेंडुलकर हे जनसामान्याचे नेते आहेत. २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे २७ आमदार निवडून येणार, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

यावेळी सभापती गणेश गावकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, मंत्री सुभाष फळदेसाई, रमेश तवडकर, सुभाष शिरोडकर, आमदार संकल्प आमोणकर, ॲड. नरेंद्र सावईकर, माजी मंत्री महादेव नाईक, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी मंत्री दीपक पाऊस्कर, भाजप नेते संजू देसाई, गोवा राज्य महिला मोर्चा अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, नगरसेवक विश्वनाथ दळवी, गोवा बजरंग दलचे प्रमुख संकेत आर्सेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आपण सभापती पदावर पोचण्यास विनय तेंडुलकर यांचा फार मोठा वाटा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्यासोबत राहून मला निवडून आणले, असे सभापती डॉ.गणेश गावकर यांनी सांगितले.

CM Pramod Sawant
Goa Politics: खरी कुजबुज; कोकणीच्या नावाने इंग्रजी शाळा

आम्ही राम-लक्ष्मण : तेंडुलकर

आमदार गणेश गावकर यांना पक्षाने सभापतिपदाची मोठी जबाबदारी दिली, हेच माझे मोठे गिफ्ट आहे. माझे व गणेश यांचे चांगले संबंध आहेत. राम-लक्ष्मण सारखी आमची जोडी असल्याचे विनय तेंडुलकर यांनी यावेळी सांगितले.

CM Pramod Sawant
Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांचे भोजन

सभापतींचे जोरदार स्वागत

सावर्डेच्या आमदाराला सभापती होण्याचा बहुमान गणेश गावकर यांच्या रूपाने पहिल्यांदाच मिळाला आहे. त्यांचे मित्र विनय तेंडुलकर यांचा वाढदिवस असल्याने ते एस्कॉर्टच्या गाडीचा सायरन वाजवत दाभाळला पोहचले तेव्हा तेंडुलकर यांच्या निवासस्थानी उपस्थित लोकांना मुख्यमंत्रीच आल्याचे वाटले. मात्र गाडीतून उतरून सभापती गणेश गावकर यांची दमदार एंट्री झाली तेव्हा उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचे जोरदार स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com