Russian Tourist: ..यंदा रशियन पर्यटक वाढणार? व्‍यावसायिकांची अपेक्षा; नेदरलँड, पोर्तुगाल, स्‍पेन आणि युकेकडेही लक्ष

Goa Tourism: मागच्‍यावर्षी रशिया-युक्रेन युद्धामुळे गोव्‍यात येणाऱ्या रशियन पर्यटकांच्‍या संख्‍येत घट झाली होती. यावेळीही रशिया-युक्रेन युद्धाचे सावट अजूनही निवळलेले नाही.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मागच्‍यावर्षी रशिया-युक्रेन युद्धामुळे गोव्‍यात येणाऱ्या रशियन पर्यटकांच्‍या संख्‍येत घट झाली होती. यावेळीही रशिया-युक्रेन युद्धाचे सावट अजूनही निवळलेले नाही. असे जरी असले तरी मागच्‍यावर्षीच्‍या तुलनेत यावेळी रशियातून बऱ्यापैकी पर्यटक गोव्‍यात येतील, अशी शक्‍यता पर्यटन व्‍यावसायिकांच्‍या वर्तुळातून व्‍यक्‍त केली जात आहे. २ ऑक्‍टोबरपासून गोव्‍यातील पर्यटन हंगाम सुरू होत असून त्‍या पार्श्वभू्मीवर या घटनेकडे सकारात्‍मक दृष्‍टीने पाहिले जात आहे.

गोवा २०२५-२६ पर्यटन हंगामासाठी सज्ज असून २ ऑक्टोबरपासून नोव्होसिबिर्स्कहून मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठवड्यातून तीन नवीन विमानसेवा सुरू होणार आहेत. याशिवाय येकातेरिनबुर्ग व मॉस्कोहून एअरोफ्लोटच्या विद्यमान सेवा सुरू राहतील. त्यामुळे एकूण आठवड्याला नऊ विमानांचे आगमन होणार असून, कझाकस्तानहून चार्टर विमानसेवाही २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.

गोव्‍यात आतापर्यंत सर्वांत मोठ्या प्रमाणावर ब्रिटीश पर्यटक येत असून त्‍यामागोमाग रशियन पर्यटकांचा क्रमांक लागतो. गोव्‍यातील हॉटेल्‍स आणि शॅक यांचा व्‍यवसाय या दोन पर्यटकांवर अवलंबून असतो. एअर इंडिया कंपनीने गोवा गॅटविक यादरम्‍यानची फ्लाईट बंद केल्यामुळे गोव्‍यात येणाऱ्या ब्रिटीश पर्यटकांच्‍या संख्‍येत काही प्रमाणात घट होणार असली तरी ती घट रशियन पर्यटक भरून काढतील, अशी अपेक्षा आहे.

गोव्‍यातील पर्यटन व्‍यवसाय यांची शिखर संस्‍था असलेल्‍या ट्रॅव्‍हल ॲण्‍ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा या संघटनेचे अध्‍यक्ष जॅक सुखिजा यांच्‍या मते, युकेतील चार्टर कंपन्‍यांकडून जरी कमी प्रतिसाद असला तरी रशियन चार्टर कंपन्‍यांकडून सकारात्‍मक प्रतिसाद मिळालेला आहे. यावेळी उझबेकिस्‍तान येथून गोव्‍यात सुरु असलेली थेट विमानसेवा बंद झालेली आहे.

Goa Tourism
Goa Tourism: बाईक रेंट कमी, शॅक उभारणी! गोव्‍यासमोर महाराष्‍ट्र, कर्नाटकचे आव्‍हान; पर्यटनक्षेत्रात वाढली स्पर्धा

यामुळे काही पर्यटकांना ताश्‍‍कंदहून दिल्‍लीला येऊन नंतर दिल्‍लीतून गोव्‍यात यावे लागणार आहे. त्‍यामुळे या भागातील पर्यटकांकडून गोव्‍याला कसा प्रतिसाद मिळणार हे येत्‍या पंधरा ते वीस दिवसांत स्‍पष्‍ट होणार, असा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.

Goa Tourism
Goa Tourism: 20 वर्षांपूर्वी असं न्हवतं! आधुनिकतेमागे धावताना गोव्याने पर्यटनातला Essense गमावलाय?

‘फिट पर्यटक’ही वाढतील!

आंतरराष्‍ट्रीय पर्यटन व्‍यवसायात कार्यरत असलेल्‍या ‘सीटा’ या कंपनीचे मुख्‍य ऑपरेटिंग अधिकारी अर्नेस्‍ट डायस यांच्‍या मते, ‘टीयूआय’ ही कंपनी नोव्‍हेंबरपासून दर आठवड्याला चार चार्टर विमाने गोव्‍यात घेऊन येणार आहे. याशिवाय स्‍वत:हून फिरणारे पर्यटकही ज्‍यांना पर्यटन वर्तुळात ‘फिट पर्यटक’ म्‍हणून ओळखतात तेही यावेळी गोव्यात येण्‍याची शक्‍यता आहे. नेदरलँड, पोर्तुगाल, स्‍पेन आणि युकेचे पर्यटक यावेळी गोव्‍यात वाढतील, अशी शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com