Supreme Court Dainik Gomantak
देश

धर्म संसद द्वेषपूर्ण भाषण प्रकरण: SC ने फटकारल्यानंतर दिल्ली पोलिसांचा 'यू-टर्न'

दिल्लीतील धर्म संसदेत हेट स्पीच प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकारल्याचा परिणाम दिसून आला आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्लीतील धर्म संसदेत हेट स्पीच प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्याचा परिणाम दिसून आला आहे. दिल्ली पोलिसांनी द्वेषपूर्ण भाषणावर एफआयआर दाखल केला. नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करुन दिल्ली पोलिसांनी (Police) सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली. (Delhi Police has registered an FIR against a hate speech in the Dharma Parliament in Delhi)

दरम्यान, दिल्ली (Delhi) पोलिसांनी नवीन प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, 'आम्ही संपूर्ण तापासाअंती एफआयआर नोंदवला आहे. याप्रकरणी कायद्यानुसार कारवाई केली जाईल. तक्रारीतील सर्व दुवे आणि सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध इतर सामग्रीचे विश्लेषण केले गेले आहे. विशेष म्हणजे YouTube वर एक व्हिडिओ देखील सापडला आहे.'

तसेच, पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर, 4 मे रोजी ओखला औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 153A, 295A, 298 आणि 34 अंतर्गत गुन्ह्यांसाठी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी आपल्या पूर्वीच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, ''पुरावे आणि सामग्रीच्या तपासणीचे निष्कर्ष दर्शवतात की, भाषणात कोणत्याही विशिष्ट समुदायाविरूद्ध द्वेषयुक्त भाषण नव्हते. आणि तिथे जमलेले लोक आपल्या समाजाची नैतिकता वाचवण्याच्या उद्देशाने आले होते.''

दुसरीकडे, मुस्लिमांच्या नरसंहारासाठी खुले आवाहन असा अर्थ लावता येईल, अशा शब्दांचा वापर केलेला नाही, असे पोलिसांनी म्हटले होते. यावर सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले आणि नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. आता या प्रकरणावर 9 मे रोजी सुनावणी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT