तजिंदर बग्गाविरुद्ध मोहाली कोर्टातून वॉरंट जारी

तजिंदर बग्गाविरुद्ध मोहाली कोर्टातून वॉरंट जारी करण्यात आले आहे.
 Tajinder Bagga
Tajinder Bagga Dainik Gomantak
Published on
Updated on

देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून अनेकविध मुद्यावरुन गाजत आहे. एकीकडे सामन्या नागरिकांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना खुली धमकी देणाऱ्या तिजंदर बग्गा भोवती दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमधील (Punjab) राजकारण फेर धरत आहे. यातच आता तजिंदर बग्गाविरुद्ध मोहाली कोर्टातून वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांना अटक करुन आणण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.

 Tajinder Bagga
कोण आहे तजिंदर बग्गा? 'प्रशांत भूषण यांना थप्पड मारणारा...'

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते तजिंदर बग्गा यांचा त्रास अद्याप कमी झालेला नाही. पंजाबच्या मोहाली न्यायालयाने शनिवारी बग्गाविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. न्यायालयाने पंजाब पोलिसांना तजिंदर बग्गा यांना अटक करुन हजर करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, दिल्लीतील भाजप नेते बग्गा यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरुच आहे. भाजप नेत्यांनी शनिवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर निदर्शने केली.

तसेच, शुक्रवारी दिवसभराच्या राजकीय नाट्यानंतर बग्गा रात्री उशिरा घरी पोहोचले. त्यांना मध्यरात्री द्वारका सिटी मजिस्ट्रेट कोर्टच्या घरी हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. बग्गा यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेशही न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत.

याशिवाय, बग्गा यांच्या अटकेवरुन शुक्रवारी दिल्लीपासून कुरुक्षेत्रापर्यंत गदारोळ झाला होता. पंजाब पोलिसांनी शुक्रवारी सकाळी तेजिंदर बग्गा यांना दिल्लीत अतिशय नाट्यमय पद्धतीने अटक केली. दुसरीकडे, बग्गाच्या वडिलांनी दिल्लीत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दिल्लीतून बग्गा यांच्या अपहरणाची माहिती मिळताच हरियाणा (Haryana) पोलिसांनी कारवाई केली आणि कुरुक्षेत्रात मोहालीकडे जाणाऱ्या पंजाब पोलिसांच्या ताफ्याला रोखले. हरियाणा पोलिसांनी दिल्ली पोलिसांना कुरुक्षेत्रमध्ये बोलावून तेजिंदर पाल बग्गाला त्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर दिल्ली (Delhi) पोलिसांनी बग्गाला दिल्लीत आणले आणि पंजाब पोलीस मात्र पाहतच राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Meta Apology Narendra Modi Video
Mark Zuckerberg apology India
Meta CEO Mark Zuckerberg Apology Demand IT Committee
Minister addressing the media over the women's free bus travel scheme
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com