Crime News Dainik Gomantak
देश

धक्कादायक! पैशांच्या बदल्यात सुनेनेच काढला सासऱ्याचा काटा, प्राइवेट पार्ट...

Gujarat Crime: गुजरातमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका घरात एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

Manish Jadhav

Gujarat Crime: गुजरातमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका घरात एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. वृद्धाचा खून करणारे दुसरे कोणी नसून त्याची सून असल्याचे उघड झाले आहे.

वास्तविक, सासरे आणि सून यांचे अवैध संबंध होते. सासऱ्याशी संबंध ठेवण्यासाठी सुनेने पैसेही घेतले होते. त्याच दरम्यान, ही महिला दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडली आणि परदेशात जाण्यासाठी सासऱ्याकडे दोन लाख रुपयांची मागणी करु लागली.

सासऱ्याने पैसे न दिल्याने रागाच्या भरात सुनेने त्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली आहे.

दरम्यान, गुजरातमधील (Gujarat) खडा येथील एका वृद्धाचे आपल्या सुनेशी अवैध संबंध होते. त्या व्यक्तीच्या सुनेनेही त्याच्याशी संबंध ठेवण्यासाठी पैसे घेतले होते.

दरम्यान, सुनेने सासऱ्याकडे आणखी पैसे मागितले असता, त्याने ते देण्यास नकार दिला. खडा येथील 75 वर्षीय जगदीश शर्मा यांची त्यांच्याच सुनेने डोक्यात वार करुन त्यांचा प्रायव्हेट पार्ट कापून हत्या केली.

दुसरीकडे, तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या शर्मा यांची कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून तपास केला असता घरातील एका खोलीत वृद्धाचा मृतदेह आढळून आला.

या प्रकरणी पोलिसांनी (Police) सुनेला ताब्यात घेऊन तिची कडक चौकशी केली असता, सुनेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सुनेला आता अटक केली आहे.

डोक्याला आणि गुप्तांगाला दुखापत झाल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले आहे.

दरम्यान याप्रकरणी मृत व्यक्तीच्या मोठ्या मुलाने आपल्या लहान भावाच्या पत्नीवर खून केल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता, त्यानंतर पोलिसांनी तिची कडक चौकशी केली.

चौकशीदरम्यान महिलेने गुन्ह्याची कबुली देत अनेक​​धक्कादायक खुलासे केले. परदेशात जाण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सुनेने सांगितले, मात्र सासरच्यांनी पैसे देण्यास नकार दिला. याचाच राग आल्याने सुनेने सासऱ्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT