Cyclone Michaung|Chennai Rain Dainik Gomantak
देश

Cyclone Michaung चा धुमाकूळ! चेन्नईत मुसळधार पाऊसामुळे विमानतळाचा झाला तलाव तर गाड्याही गेल्या वाहून, पाहा व्हिडिओ

Chennai Floods: तामिळनाडूमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये गाड्या तरंगताना दिसत आहेत.

Ashutosh Masgaunde

Cyclone Michaung In Chennai, due to heavy rains, the airport became a lake and cars were also washed away, watch the video:

मिचॉन्ग चक्रीवादळामुळे चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. चेन्नईमध्ये 196 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर नुगांगबक्कममध्ये गेल्या 24 तासांत 154 मिमी पाऊस झाला आहे.

मिचॉन्ग चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या उर्वरित भागात पाऊस पडत असून, राज्य यंत्रणा त्याच्या तयारीत व्यस्त आहे.

अनेक व्हिडिओ व्हायरल

मिचॉन्ग चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागरात असून, ते आंध्र प्रदेशच्या किनारी भागाकडे सरकत आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

तमिळनाडूच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय चेन्नई, चेंगापट्टू, कांचीपुरम, नागापट्टिनम, गुड्डालोर जिल्हा, तिरुवल्लूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये गाड्या तरंगताना दिसत आहेत.

शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी

मिचॉन्ग चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नईतील काही भागात पूर आला आहे. हे चक्रीवादळ उद्या नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान कुठेतरी उतरेल अशी शक्यता आहे.

सोमवारी सकाळी 5.30 वाजेपर्यंत चेन्नईमध्ये 196 मिमी पाऊस झाला तर जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये 154 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे चेन्नई आणि आजूबाजूच्या तीन जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये सोमवारची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

5000 मदत केंद्रे

अधिकाऱ्यांनी किनारी जिल्ह्यांमध्ये सुमारे 5,000 मदत केंद्रे स्थापन केली आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या लोकांना या मदत केंद्रांमध्ये आश्रय दिला जाईल. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले की, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.

सध्या काय आहे चेन्नईची स्थिती?

मिचॉन्ग चक्रीवादळामुळे चेन्नईत सतत मुसळधार पाऊस पडत आहे. चक्रीवादळाचा कहर चेन्नईवर स्पष्ट दिसत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील सर्वच भागात पाणी साचले आहे.

विमान आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये बंद आहेत. ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनमध्ये सोमवारी सकाळपर्यंत 340 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

चेन्नईतील 3319 किमी लांबीचे ड्रेन नेटवर्क पूर्णपणे निकामी झाल्याने ही परिस्थिती बिकट झाली.

चेन्नई कॉर्पोरेशनचे आयुक्त डॉ जे राधाकृष्णन यांनी चक्रीवादळ मिचॉन्गचा वेग कमी होणे हे मोठे आव्हान असल्याचे वर्णन केले आहे. लहान कालवे, मोठे कालवे आणि नद्यांसह त्याची संपूर्ण पाणी काढण्याची यंत्रणा कोलमडली आहे. त्यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

SCROLL FOR NEXT