Viral Video: उन्माद जिवावर बेतला, विजयाचा आनंद साजरा करताना कार्यकर्त्याच्या अंगावर ट्रॅक्टर उलटला

Telangana Assembly Election 2023: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात वेगात डावीकडे वळण घेण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर समर्थकाच्या अंगावर पडताना दिसत आहे.
Telangana Assembly Election Results 2023.
Telangana Assembly Election Results 2023.Dainik Gomantak

Telangana Congress supporter was seriously injured while performing a stunt on tractor during Dudilla Sridhar Babu's victory celebrations:

तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्ये दुडिल्ला श्रीधर बाबू यांच्या विजयाच्या उत्सवादरम्यान ट्रॅक्टरवर स्टंट करताना काँग्रेस पक्षाच्या समर्थकाला रविवारी गंभीर दुखापत झाली.

बाबू विजयी झाल्याची घोषणा होताच मंथनी येथे कार्यकर्त्यांनी जोल्लोष सुरू केला आणि परिसरात ट्रॅक्टरवर विजयी मिरवणूक काढली.

अनेक ट्रॅक्टर रस्त्यावर स्टंट करत असताना त्यातील एक ट्रॅक्टर भरधाव वेगात जागेवर फिरला आणि त्यात कार्यकर्ता गंभीर जखमी झाला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात वेगात डावीकडे वळण घेण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर समर्थकाच्या अंगावर पडताना दिसत आहे.

या विचित्र अपघातातून समर्थक बचावला की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.

Telangana Assembly Election Results 2023.
एबीव्हीपी, जायन्ट किलर आणि... कोण आहेत तेलंगणातील मुख्यमंत्री पदाचे दावेदार Revanth Reddy?

तेलंगणाच्या मंथनी जागेवर, कॉंग्रेसचे डी. श्रीधर बाबू यांनी 103822 मते मिळवली आणि BRS च्या पुट्टा मधुकर यांना 72442 मतांनी पराभूत केले.

मंथनी विधानसभा मतदारसंघ हा उत्तर तेलंगणा प्रदेशातील आणि भारताच्या दक्षिण प्रदेशातील तेलंगणा राज्यातील पेड्डापल्ली जिल्ह्यातील एक जागा आहे.

मंथनी हा पेड्डापल्ले लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. या मतदारसंघाचे सर्वसाधारण; ग्रामीण मतदारसंघ असे वर्गिकरण करण्यात आले आहे.

Telangana Assembly Election Results 2023.
Telangana Assembly Election Result 2023: तेलंगणाचे डीजीपी निलंबित, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

तेलंगणामध्ये 119 सदस्यीय विधानसभेसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. त्याचे निकाल रविवारी जाहीर झाले आहेत.

यामध्ये निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस 64 जागा जिंकून तेलंगणातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याच वेळी, बीआरएसने आतापर्यंत 39 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने 8 जागांवर विजय मिळवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com