Cyclone  Dainik Gomantak
देश

Cyclone Biparjoy: तिन्ही दल चक्रीवादळ बिपरजॉयसाठी सज्ज, संरक्षण मंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

चक्रीवादळ बिपरजॉय प्रथम गुजरातला धडकू शकते, ज्यासाठी लष्कर आणि बीएसएफने पूर्ण तयारी केली आहे.

Puja Bonkile

Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळाच्या धोक्याबाबत गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे धोकादायक चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. 

त्यापूर्वी संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही तयारीचा आढावा घेतला. तिन्ही दलांना बिपरजॉयसाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. 

वादळानंतर जे काही नुकसान होईल किंवा लोकांना बाहेर काढण्यासाठी सैन्याचा वापर केला जाईल, जे एनडीआरएफसोबत बचाव कार्य करू शकेल. स्वतः संरक्षणमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. 

  • बिपरजॉय गुजरातमध्ये कधी पोहोचेल 

चक्रीवादळ बिपरजॉयचा गुजरात आणि महाराष्ट्रासह 9 राज्यांना धोका आहे. आज म्हणजेच १५ जूनला हे वादळ गुजरातमध्ये पोहोचेल आणि किनारपट्टीला धडकेल. या वादळाचा सर्वाधिक परिणाम सौराष्ट्र आणि कच्छमध्ये दिसून येईल. 

वाऱ्याचा वेग ताशी 150 किमीपेक्षा जास्त असू शकतो असे सांगण्यात आले आहे. वादळ प्रथम कच्छच्या जाखाऊ बंदरावर धडकणार आहे. धोकादायक वादळापूर्वी किनारपट्टीवर राहणाऱ्या हजारो लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्याच वेळी, किती लोक धोक्याच्या झोनमध्ये आहेत हे सतत पाहिले जात आहे. 

  • लष्कराबरोबरच बीएसएफही सज्ज

गुजरातमध्ये (Gujrat) येणाऱ्या चक्रीवादळासाठी लष्कराव्यतिरिक्त सीमा सुरक्षा दल (BSF) ही सज्ज आहे. गुजरात किनारपट्टीकडे सरकणाऱ्या ‘बिपरजॉय’ या तीव्र चक्रीवादळाच्या परिणामांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी बीएसएफने तयारी केली आहे.

सुरक्षेची सर्व व्यवस्था करण्यात आली असून अशी उपकरणे जवानांना देण्यात आली आहेत, जी मदत आणि बचावकार्यात मदत करू शकतील.

  • केंद्रीय मंत्र्यांवर जबाबदारी

बिपरजॉयचा प्रभाव गुजरात आणि महाराष्ट्रासह लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि पश्चिम राजस्थानमध्ये दिसून येतो. या वादळाबाबत या सर्व राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यावर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे. केंद्रीय मंत्र्यांकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली असून ते घटनास्थळी हजर आहेत.

IMD कडून सांगण्यात आले आहे की 15 जून रोजी वादळाचा वेग खूप जास्त असू शकतो, परंतु 16 जूनच्या सकाळपर्यंत वेग 85 किमीपर्यंत घसरेल. हे वादळ 17 जूनला राजस्थानमध्ये पोहोचेल, तोपर्यंत त्याचा वेग खूपच कमी असेल. म्हणजेच गुजरातलाच बिपरजॉयचा सर्वाधिक धोका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT