Kolkata Airport Fire Video: कोलकाता विमानतळावर बुधवारी रात्री आग लागली. विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या चेक-इन काउंटरजवळ अचानक आग लागली, त्यानंतर संपूर्ण परिसर धुराने भरला होता.
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. काही वेळाने आग पूर्णपणे आटोक्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.
कोलकाता विमानतळ प्राधिकरणाने आगीचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. रात्री 9:15 च्या सुमारास ही घटना घडली, अनेक प्रत्यक्षदर्शींनी गेट 3 जवळील सुरक्षा तपासणी काउंटरच्या बाजूने धूर निघत असल्याचे सांगितले. या घटनेने विमानतळ परिसरात खळबळ उडाली आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय (NSCBI) विमानतळ कोलकाता चेक-इन एरिया पोर्टल डी येथे रात्री 9.12 च्या सुमारास किरकोळ आग लागली. आग रात्री 9.40 पर्यंत नियंत्रणात आणण्यात आली.
सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून चेक-इन परिसरात धुराचे लोट आढळल्याने ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.