Gujarat Crime Dainik Gomantak
देश

प्रेमभंगाचा सायबर बदला! गुजरातच्या 'दिलजले आशिक'ने 100 मुलींना गंडवलं

Gujarat Crime: गुजरातमध्ये 100 हून अधिक मुलींना लुटणारा 'दिलजला आशिक' पकडला गेला आहे. राकेश सिंग असे आरोपीचे नाव आहे.

Manish Jadhav

Gujarat Crime: गुजरातमध्ये 100 हून अधिक मुलींना लुटणारा 'दिलजला आशिक' पकडला गेला आहे. राकेश सिंग असे आरोपीचे नाव आहे. त्याला मुलींचा बदला घ्यायचा होता. प्रेमात फसवणूक झाल्यानंतर राकेश मुलींचा तिरस्कार करु लागला. त्याने मुलींना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. गेल्या आठ वर्षांपासून तो मुलींची फसवणूक करत होता.

प्रेमात फसवणूक आणि मग...

गुजरातमध्येच (Gujarat) नव्हे तर राकेश देशभरातील मुलींना आपला शिकार बनवत होता. वडोदरा सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडले आहे. TOI च्या रिपोर्टनुसार, राकेशला एक गर्लफ्रेंड होती.

तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्याने तिच्यावर सुमारे दीड लाख रुपये खर्च केले होते. मात्र ती त्याला सोडून गेली. याचा राकेशला खूप राग आला होता. याचाच बदला म्हणून त्याने मुलींना फसवून लुटण्याचे ठरवले.

त्याने फसवणूक कशी केली?

पकडल्यानंतर राकेशने चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले. आठ वर्षांत त्याने 100 हून अधिक मुलींना आपले शिकार बनवले. तो सोशल मीडिया (Social Media) आणि मॅट्रिमोनिअल साइटच्या माध्यमातून मुलींशी मैत्री करायचा. मित्र असल्याचे भासवून तो त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवत असे. त्यानंतर फसवणुकीचा खेळ सुरु व्हायचा... तो त्यांना दमदाटी करुन लाखो रुपये लुटायचा.

दुसरीकडे, 'दिलजला आशिक' सोशल मीडियावर स्वत:ची ओळख बिझनेसमॅन सांगत असे. काहींना तो पोलिस अधिकारी तर काहींना जज म्हणून आपली ओळख सांगत असे.

प्रेमाचे नाटक करुन तो मुलींना फसवायचा आणि नंतर ब्लॅकमेल करायचा. फसवणूक केल्यानंतर तो त्या मुलीच्या संपर्कातून गायब व्हायचा. आठ वर्षे हे काम करुन तो एक दुष्ट सायबर गुन्हेगार बनला होता.

फसवणूक केलेले पैसे घेऊन तो महागड्या हॉटेलमध्ये जात असे. मात्र आता, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रत्यक्षात वडोदरा येथील एका महिलेने लाखो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.

मैत्री आणि प्रेमाचे जाळ्यात अडकवून आरोपीने पीडितेचे काही खाजगी फोटोही घेतले होते. त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करु लागला होता. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. आता आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT