कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी (customs officers) सोमवारी नागपट्टिनम बंदराजवळ 150 किलो गांजा जप्त केला आहे.  Dainik Gomantak
देश

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नागपट्टिनम बंदराजवळ 150 किलो गांजा जप्त

अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित उर्वरित संशयितांचा कस्टमअधिकारी (customs officers) शोध घेत आहेत. जप्त केलेल्या अमली पदार्थाचे नेमके मूल्य अद्याप समजू शकलेले नाही.

दैनिक गोमन्तक

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी (customs officers) सोमवारी नागपट्टिनम बंदराजवळ 150 किलो गांजा जप्त केला आहे. याची श्रीलंकेत (Sri Lanka) अमली पदार्थांची (Drugs) तस्करी केली जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारावर, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी (customs officers) सोमवारी रात्री नागपट्टिनम बंदर (Nagapattinam Port), कीचनकुप्पम, अक्कराइपेट्टी आणि इतर आसपासच्या किनारपट्टी भागात सखोल शोध घेतला असता, त्यांनी नागापट्टिनम बंदरात काही लोकांना गांजा बोटीत लोड करताना पाहिले. जेव्हा अधिकारी बोटीवर पोहोचले, तेव्हा तेथे असलेल्या लोकांच्या गटाने माल आणि इतर वाहने सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

नागपट्टिनम कोस्टल सिक्युरिटी ग्रुपचे अधिक्षक के गुनासेकेरन म्हणाले, ज्या बोटचा वापर गांजा वाहतूकीसाठी केला गेला. ती बोट 'नागाई मीनवन' या यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्या लोकप्रिय मच्छीमार गुनासिलनची (26), होती. बोटीत प्रत्येकी सुमारे 15 किलो गांजा असलेल्या सुमारे 10 पिशव्या सीमाशुल्क विभागाने जप्त केल्या आहेत. तसेच चार मोटारसायकली देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. पण याचे आरोपी मात्र अद्याप फरार आहे. त्याने युट्यूब चॅनेल चालवण्याच्या बहाण्याने या फायबर बोटचा वापर या प्रतिबंधित वस्तूंच्या वाहतुकीसाठी केला. असे गुनासेकेरन यांनी स्पष्ट केले. अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित उर्वरित संशयितांचा कस्टम अधिकारी शोध घेत आहेत. जप्त केलेल्या अमली पदार्थाचे नेमके मूल्य अद्याप समजू शकलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

केळीच्या गभ्याचा एक खांब तळ्यात उभा केला जातो, त्याला सुपारीच्या फळ्या लावून त्यावरती दिवे ठेवले जातात; गोव्यातील निसर्गपूजक संस्कृती

Opinion: महिलांनाही 'स्वतंत्र'पणे जगावेसे वाटत असेल तर त्यांच्यासाठी पर्याय का खुला असू नये?

बंगाल हादरले! झोपेत असताना 'मच्छरदाणी फाडून'अपहरण, लैंगिक अत्याचारानंतर 4 वर्षांची चिमुकली आढळली गटाराजवळ

Konkani Drama: सर्जनशीलतेचा प्रत्यय देणारी व्हिजुअल ट्रिट - ‘इन सर्च ऑफ सर्वायव्हल’

Goa Chess World Cup: जगज्जेत्या गुकेशचे आव्हान संपुष्टात! स्वेनने केले पराभूत; अर्जुन, प्रज्ञानंद, हरिकृष्ण, प्रणव चौथ्या फेरीत दाखल

SCROLL FOR NEXT