चेन्नई: गोव्यातील शिवोली येथील रशियन मॉडेलने (Russian model’s death case) आपल्या निवासस्थानी आत्महत्या केली. ती मृतावस्थेत आढळल्यानंतर तीन दिवसांनी, ग्रेटर चेन्नई पोलिसांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तिने तक्रार दाखल केली होती तेव्हा या प्रकरणात कोणत्याही तपशीलासाठी चेन्नई पोलीस (Chennai Police) गोवा पोलिसांना (Goa police) मदत करण्यास तयार आहेत.
24 वर्षीय अभिनेत्री, अलेक्झांड्रा डीजावीने (Alexandra Djavi), तमिळ चित्रपट कंचना 3 (Kanchana 3) मध्ये अभिनय केला. चेन्नईतील एका फोटोग्राफरने तीच्यासोबत लैगिक छळ केल्याचा आरोप तिने केला होता. तीच्या या तक्रारीची दखल घेत चेन्नई पोलिसांनी आरोपीला अटकही केली होती.
आलेक्झेंड्रा री डिजावी चा मृतदेह शुक्रवारी एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला. गोवा पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हळदोणातील तरूणीचे मृत्यू प्रकरण अजून ताजे असतानाच ओशेलमध्ये दोन रशियन महिलांच्या अनैसर्गिक मृत्यूंचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे बार्देश तालुका हादरला आहे. रशियन मॉडेल आलेक्झेंड्रा री डिजावी (24) आणि एकातिरोना टिटोवा (34) या दोघींच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद हणजूण पोलिस ठाण्यात झाली आहे. एकाच दिवशी आणि तासाभराच्या अंतराने ओशेलात हे प्रकार उघडकीस आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हणजूण पोलिसांनी या प्रकरणात ओशेल पंचायत क्षेत्रातील वेगवेगळ्या वाड्यांवर मृत झालेल्या या महिलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवले होते. त्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, त्यांचे कुटुंबीय आल्याशिवाय यासंदर्भातील कोणतीही माहिती उघड करता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या महिलांच्या मृत्यूबद्दल रशियन दूतावासाला कळविल्याचे पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी सांगितले
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.