corona virus Dainik Gomantak
देश

Corona Virus: आता कोरोनाची लाट संपली, WHO ची मोठी घोषणा

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनावरील जागतिक आरोग्य आणीबाणी हटवण्यात आली आहे.तरीसुध्दा नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची लाट संपली आहे अशी घोषणा जागतिक आरोग्य संगटनेने केली आहे. जागतिक आरोग्य आणीबाणी हटवण्यात आली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस यांनी म्हटले की, काल (5 मे) आपत्कालीन समितीची 15 वी बैठक झाली. यामध्ये, कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेबाहेर घोषित करावे, अशी शिफारस करण्यात आली. ही शिफारस आपण स्वीकारत असल्याचे डॉ. टेड्रोस यांनी म्हटले. 

  • जागतिक आरोग्य आणीबाणी केव्हा जाहीर झाली?

WHO ने सांगितले की 30 जानेवारी 2020 रोजी कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आले. आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आले तेव्हा चीनमध्ये 100 पेक्षा कमी कोरोना रुग्ण होते आणि एकाचाही मृत्यू झाला नाही, परंतु तीन वर्षानंतर मृतांची संख्या 7 दशलक्ष झाली आहे. यात सुमारे 2 कोटी लोकांनी आपला जीव गमावला आहे.

  • ही आणीबाणी का हटवली

डब्ल्यूएचओने (WHO) सांगितले की, गेल्या वर्षभरात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झालेली घट लक्षात घेऊन सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणीतून कोरोना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

आरोग्य संघटनेने सांगितले की कोरोनाचा इतका मोठा परिणाम झाला की शाळा ते कार्यालय बंद राहिले. या काळात अनेक लोकांना आर्थिक समस्यांमधुन जावे लागले. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थाही उद्ध्वस्त झाली. 

  • WHO चे महासंचालक काय म्हणाले?

डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ टेड्रोस म्हणाले की, जागतिक आरोग्य आणीबाणी हटवली तरी सुद्धा या विषाणुचा धोका संपलेला नाही.  मागील आठवड्यात दर तीन मिनिटाला कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू होत होता. कोरोनाचे नवीन व्हेरिएंट येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

  • कोणती काळजी घ्यावी

सोशल डिस्टन्सिंगचे पालण करावे. म्हणजे एखाद्याला भेटल्यास हस्तांदोलन किंवा मिठी न घेता. यासाठी तुम्ही हात जोडून अभिवादन करू शकता.

कोरोनाला सामोरे (Corona) जाण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी दोन यार्डांचे अंतर करावे असे सांगण्यात आले. जेणेकरून कोरोनाचा प्रसार रोखता येईल.

लोकांना सरकारने हाताने बनवलेले फेस मास्क पुन्हा वापरता येण्याचा सल्ला दिला आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला.

जर तुम्ही बाहेर असाल तर तुमच्या डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला हात लावणे टाळा. यासाठी तुम्ही आधी हँड सॅनिटायझर वापरू शकता. सतत हात धुत राहा.

कोरोनाला रोखण्यासाठी उघड्यावर थुंकणे टाळावे, असा सल्लाही सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका कायम आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी अत्यंत आवश्यक असतानाच प्रवास (Travel) करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका असेही सांगण्यात आले आहे.

सोशल मीडियावर (Social Media) अशी कोणतीही पोस्ट टाकू नका, ज्यामुळे नकारात्मक माहिती किंवा भीती पसरण्याचा धोका असेल. जर तुम्हाला कोरोनाबद्दल कोणतीही माहिती मिळवायची असेल, तर त्यासाठी विश्वासार्ह स्त्रोत वापरा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT