King Charles यांचा आज राज्याभिषेक; उपराष्ट्रपती धनखर यांनी घेतली भेट

किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी भेट घेतली असुन अनेक विषयांवर चर्चा केली आहे.
King Charles
King CharlesDainik Gomantak
Published on
Updated on

King Charles: किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक आज (6 मे) ला ब्रिटनमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्याची संपुर्ण तयारी झाली आहे. कार्यक्रमादरम्यान 11,000 सुरक्षा दल प्रत्येक पैलूवर लक्ष ठेवतील. 

या सोहळ्यात देश-विदेशातील सुमारे दोन हजार मान्यवर सहभागी होणार आहेत. यामध्ये भारताकडून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा समावेश असेल, तर अमेरिकेकडून राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नी जिल बिडेन यांचा समावेश असणार आहे.

शुक्रवारी उपराष्ट्रपती धनखर यांनी किंग चार्ल्स तिसरे यांच्या स्वागत समारंभात त्यांच्याशी संवाद साधला. ब्रिटनच्या नवीन सम्राटाच्या ऐतिहासिक राज्याभिषेकासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या जगभरातील अंदाजे 100 राज्य आणि सरकार प्रमुखांमध्ये धनखर, त्यांची पत्नी डॉ. सुदेश धनखर यांचा सहभाग आहे.

तब्बल 70 वर्षांनंतर ब्रिटनमध्ये एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यापूर्वी 1953 मध्ये महाराणी एलिझाबेथ II च्या राज्याभिषेकाच्या वेळी असा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

किंग चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला हे डायमंड ज्युबिली स्टेट कोचमध्ये बकिंगहॅम पॅलेस ते वेस्टमिन्स्टरला जातील. या कोचची निर्मिती 2012 मध्ये करण्यात आली होती.

ऋषी सुनक हे राजा चार्ल्स तिसरा यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने 'बायबल ऑफ कोलोसियन्स' या पुस्तकातील संदेश वाचतील. सुनक हे भारतीय वंशाचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान आणि धर्माभिमानी आहेत.

  • ब्रिटनमध्ये राज्याभिषेक कसा होतो

राज्याभिषेकात सम्राटाच्या डोक्यावर औपचारिक पद्धतीने राजमुकुट ठेवला जातो.

परंपरागत पद्धतीनुसार राज्याभिषेक हा एक संस्कार आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा विधी आहे.

वेस्टमिनिस्टर ॲबे येथे गेल्या 900 वर्षांपासून राज्याभिषेकाची प्रथा पाळली जाते.

परंपरेनुसार ब्रिटनचे राजे आणि राण्यांना 1066 मध्ये विल्यम द कॉन्करनंतर वेस्ट मिनिस्टर ॲबेमध्ये मुकुट परिधान केला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com