Congress  
देश

Congress President Election:...अखेर काँग्रेसाला मिळणार अध्यक्ष; 17 ऑक्टोबरला निवडणूक

19 ऑक्टोबरला होणार मतमोजणी

गोमन्तक डिजिटल टीम

अखेर काँग्रेसाला अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक (Congress President Election) 17 ऑक्टोबरला होणार आहे. यासाठी 22 सप्टेंबरला अधिसूचना जारी होणार आहे. 24 सप्टेंबरपासून नामनिर्देशन सुरू होईल. 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. सीडब्लूसीचा (CWC) शिक्कामोर्तब झाल्यानंतर औपचारिक घोषणा केली जाईल.

दिल्लीत आज (दि.28) काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला क काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. याशिवाय हरीश रावत, सलमान खुर्शीद, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, कुमारी सेलजा, मधुसूदन मिस्त्री, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश, अजय माकन, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह अनेक नेते या बैठकीत काँग्रेस कार्यालयात उपस्थित होते.

7 सप्टेंबर पासून काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’

काँग्रेस पक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सुरू करणार आहे. 148 दिवसांच्या या यात्रेची सांगता काश्मीरमध्ये होणार आहे. 3,500 किमी आणि 12 राज्यांपेक्षा जास्त अंतर कापून ही यात्रा संपणार आहे. पदयात्रा, रॅली, जाहीर सभा असे या यात्रेचे स्वरूप असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

SCROLL FOR NEXT