गोवा राज्यातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न अनेकदा चर्चेत राहीला आहे. गेल्या गोवा राज्य विधानसभा निवडणूकीत हा प्रश्न चतुराईने सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्षांकडून हातळला गेला. काही वेळा विधानसभेत ही या प्रश्नावर चर्चा झाल्या मात्र हा प्रश्न समू ळ मिटण्यास तयार नाही. या पार्श्वभूमीवर गोव्यात नोकरीच्या आमिषाने फसवणूकीचे प्रकार समोर येत आहेत.
(Nigerian man held for duping a Goa youth of 1.50 lakh on pretext of job in New Zealand)
दक्षिण गोव्यातील एका युवकाला त्याच्या बेरोजगारीचा फायदा घेत दीड लाखांचा गंडा घातला असल्याचा प्रकार आणखी एकदा समोर आला आहे. या युवकाला फेनी कॉलिन्स चिक्वेंदू या नागरिकाने नोकरी लावतो अशी बतावणी करुन दीड लाख घेतले. मात्र काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या युवकाने पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीची दखल घेत सायबर विभाग पोलीसांकडून नायजेरियन फेनी कॉलिन्स चिक्वेंदू याला अटक करण्यात आली आहे. अटक झाली असली तरी मुळ प्रश्न आहे तो युवकांना पैसे देत आपणास नोकरी मिळावी ही इच्छा का झाली. असे असेल तर राज्यात कार्यक्षम हातांना योग्य काम मिळत नाही का ? हा प्रश्न समोर येतो.
युवकांच्या रोजगाराचा प्रश्न जैसे थे
अशा स्थितीला राज्यातील अनेक युवकांना आपल्या आयुष्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी सामोरे जावे लागत असल्याचं कटू सत्य समोर येते म्हणूनच व्यवस्थेने अशा युवकांची फवणूक होऊ नये, यासाठी त्यांच्या हाताला योग्य रोजगार कसा मिळेल यावर गांभिर्याने विचार करणे आवश्यक आहे. ज्याच्यामूळे असे प्रश्न समूळ संपण्यास मदत होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.