पृथ्वीभोवती अलीकडे लघुग्रहांची हालचाल वाढल्याचे दिसून येते. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने (NASA) पृथ्वी जवळून विमानाच्या आकाराचा महाकाय लघुग्रह (Asteroid) जाणार असल्याचे म्हटले आहे. आज, 28 ऑगस्ट रोजी तो पृथ्वीच्या सर्वात जवळ पोहोचेल. असे अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने म्हटले आहे. (NASA Says Massive Airplane-Sized Asteroid Will Make Its Closest Approach To Earth Today)
NASA च्या CNEOS ने माहिती दिली की NEO 2022 QP3 नावाचा लघुग्रह आज रात्री 9:55 UTC किंवा IST पहाटे 3:25 च्या सुमारास पृथ्वी ग्रहाजवळून जाईल. 100 फूट रुंद असलेला हा लघुग्रह, पृथ्वीच्या 5.51 दशलक्ष किलोमीटर इतका जवळ येण्याची शक्याता आहे.
यूएस स्पेस एजन्सीच्या प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिसने लघुग्रह जवळ असल्यामुळे रेड अर्लट दिला आहे. तसेच त्याला "संभाव्य धोकादायक वस्तू" म्हणून घोषित केले आहे. ते चंद्राच्या अंतराच्या 19.5 पट आहे. CNEOS ने पुष्टी केली की लघुग्रहाचा वेग 7.93km प्रति सेकंद आहे.
दरम्यान, शनिवारी 100-फूट-व्यासाचा लघुग्रह NEO 2022 QQ4 पृथ्वीवरून गेल्यानंतर हा प्रकार घडला आहे. महाकाय लघुग्रह प्रति सेकंद 7.23 किमी वेगाने पुढे सरकला.
लघुग्रह, ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे, त्यांचा मार्ग बदलतात, तसेच कधीकधी त्यांची टक्कर देखील होऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.