Amit Shah In Goa Dainik Gomantak
देश

Amit Shah: काँग्रेसच्या 70 वर्षाच्या कार्यकाळात देशाअंतर्गतच दोन देश तयार करण्याचे प्रयत्न- गृहमंत्र्यांची टीका

Amit Shah: अमित शहांनी काँग्रेसवर निशाना साधताना मोठे वक्तव्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

Amit Shah: कर्नाटकमध्ये सध्या निवडणूकीचे वारे वाहत आहे. त्यामुळे या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सतत आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आता अमित शहांनी काँग्रेसवर निशाना साधताना मोठे वक्तव्य केले आहे.

अमित शहांनी बहुमतासह आम्ही कर्नाटक निवडणूकीत निवडून येऊ असे वक्तव्य केले आहे. याबरोबरच त्यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेसने मुस्लिम समुदायाला लागू केलेले 4 टक्के आरक्षणाला असंविधानिक आहे. कॉंग्रेसने संविधानाच्या विरुद्ध जाऊन मुस्लिमांना आरक्षण दिले होते. आम्ही हे आरक्षण बंद करुन इतर समुदायाचे आरक्षण वाढवण्यचे काम केले आहे.

कॉंग्रेसने 70 वर्षाच्या कार्यकाळात देशाअंतर्गतच दोन देश तयार करण्याचे प्रयत्न केले आहे. त्याचबरोबर त्यांनी पुढे म्हटले आहे की, कर्नाटकातल्या भाजप सरकारने असंविधानिक व्यवस्था समाप्त करण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. संविधानातील बाबी प्रत्यक्ष आणण्याचे काम केले आहे. विशेष म्हणजे, ज्याचा हक्क त्याला देण्याचे काम केले आहे.

आयुष्मान भारत, किसान सम्मान निधि, मोफत अन्न, शौचालय निर्माण, उज्ज्वला योजना या योजना भाजपने सरकारने राबवल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपावर बोलताना म्हटले आहे की, हे आरोप निराधार असून कॉग्रेस आमच्यावर थोपत आहे.

आमचा नेहमी विकासावर भर असतो . गेल्या निवडणूक आणि आत्ताच्या निवडणूकीत आमची स्थिती चांगली असून भाजप बहुमताने सरकार स्थापन करेल असेही अमित शहांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT