सरकारी कर्मचारी समूह वैद्यकीय विमा गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना चौकशीसाठी बोलावले आहे. तशी त्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यासाठी आपण 27 ते 29 एप्रिल दरम्यान उपलब्ध असल्याचे मलिक यांनी ‘सीबीआय’ला कळविले आहे.
जम्मू-काश्मीरमधील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समूह वैद्यकीय विमा योजनेचे कंत्राट आणि किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित 2,200 कोटी रुपयांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.
या प्रकरणात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ‘सीबीआय’ने दोन गुन्हेही दाखल केले होते. तसेच सत्यपाल मलिक यांची या प्रकरणात चौकशीही केली होती. सध्या मलिक हे पुलवामा हल्ल्यासंदर्भातील गौप्यस्फोटामुळे चर्चेत आहेत. नोव्हेंबर 2019 ते ऑगस्ट 2020 पर्यंत ते गोव्याचे राज्यपाल होते
‘पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील त्रुटींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली होती. मात्र, त्यांनी मला गप्प राहण्यास सांगितले’, असा गौप्यस्फोट त्यांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते.
वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत
मलिक हे अनेक दिवसांपासून केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. किसान विधेयकाविरोधात धरणे धरणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थही ते बोलले होते. त्यादरम्यान त्यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकालाही विरोध केला होता.
केंद्राचे तीन कृषी कायदे रद्द करणे हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय असल्याचे ते म्हणाले होते. शिवाय नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुलवामा हल्ल्यासाठी सरकारच जबाबदार असल्याचे म्हटले होते.
पुलवामा हल्ल्याबाबत गौप्यस्फोट करून खळबळ उडवून देणारे सत्यपाल मलिक यांना पाठिंबा देण्याकरिता आता पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी एकवटले आहेत.
काँग्रेसने भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. मलीक यांनी देशासमोर त्यांचा भाजप सरकारचा भांडाफोड केला. म्हणून त्यांना नोटीस बजावली आहे, असे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.